शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

लय भारी! स्वप्निलला 'अर्जुन' पुरस्कार; आईसमान कोच दीपाली देशपांडे यांचा 'द्रोणाचार्य' पुरस्काराने सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 16:39 IST

ऑलिम्पिक मेडलिस्ट स्वप्निल कुसाळेसह त्याच्या कोच दीपाली देशपांडे यांटा राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

Swapnil Kusale Arjuna Award And His Coach  Deepali Deshpande Dronacharya Award  : भारत सरकारकडून राष्ट्रीय क्रीडा  पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्य पदक विजेता नेमबाज स्वप्निल कुसाळे याला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. एवढेच नाही तर त्याला नेमबाजीचे धडे देणाऱ्या कोच दीपाली देशपांडे यांचा द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.  राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात हा महाराष्ट्रासाठी खास आणि अभिमानास्पद क्षण ठरेल. 

स्वप्निलच्या यशात कोच देशपांडे मॅडम यांचा मोलाचा वाटा

 स्वप्निल कुसाळे हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील कांबळवा़डी या छोट्याशा गावातून येतो. खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवणारा तो महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू ठरला. माजी भारतीय नेमबाज अन्  कोच दीपाली देशपांडे यांचा त्याच्या यशात मोलाचा वाटा राहिला आगे.

कोच दीपाली देशपांडे यांना आईसमान मानतो स्वप्निल

स्वप्निल कुसाळेनं अनेकदा आपल्या वेगवेगळ्या मुलाखतीमध्ये कोच मॅडम या फक्त माझ्यासाठी गुरु नाहीत तर त्या माझ्यासाठी आईप्रमाणेच आहेत, असे  सांगितले आहे. त्यामुळे एका बाजूला लेकाला अर्जुन पुरस्कार अन् दुसऱ्या बाजूला त्याला घडवणाऱ्या आणि यशापर्यंत पोहचण्यासाठी बळ देणाऱ्या आणि आईसमान कोच दीपाली देशपांडे यांचा द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मान होणं ही क्रीडा क्षेत्रातील खास अन् दुहेरी आनंद देणारी गोष्ट आहे.  २०२४ मध्ये पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्वप्निल कुसाळे याने पुरुष गटातील ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली होती. 

टॅग्स :swapnil kusaleस्वप्नील कुसाळेparis olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४kolhapurकोल्हापूर