National Sports Awards 2024 Winners Full List : क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासह अर्जुन पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्काराची भारत सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे. वेगवेगळ्या खेळातील चार क्रीडारत्नांना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून ३२ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. प्रशिक्षकांना देण्यात येणाऱ्या द्रोणाचार्य पुरस्काराच्या यादीत दोन प्रशिक्षकांचा समावेश आहे. इथं एका नजरेत पाहा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्या खेळाडूंच्या नावाची संपूर्ण यादी
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचे मानकरी
- डी गुकेश (बुद्धिबळ)
- हरमनप्रीत सिंग (हॉकी)
- प्रवीण कुमार (पॅरा अॅथलेटिक्स)
- मनू भाकर (नेमबाजी)
अर्जुन पुरस्कार विजेत्यांची यादी
- ज्योती याराजी (अॅथलेटिक्स)
- अन्नू रानी (अॅथलेटिक्स)
- नीतू (बॉक्सिंग)
- स्वीटी (बॉक्सिंग)
- वंतिका अग्रवाल (बुद्धिबळ)
- सलीमा टेटे (हॉकी)
- अभिषेक (हॉकी)
- संजय (हॉकी)
- जरमनप्रीत सिंग (हॉकी)
- सुखजीत सिंग (हॉकी)
- राकेश कुमार (पॅरा तिरंदाजी)
- प्रीती पाल (पॅरा अॅथलेटिक्स)
- जीवनजी दीप्ती (पॅरा अॅथलेटिक्स)
- अजीत सिंह (पॅरा अॅथलेटिक्स)
- सचिन सर्जेराव खिलारी (पॅरा अॅथलेटिक्स)
- धरमबीर (पॅरा अॅथलेटिक्स)
- प्रणव सूरमा (पॅरा अॅथलेटिक्स)
- एच होकाटो सेमा (पॅरा अॅथलेटिक्स)
- सिमरन जी (पॅरा अॅथलेटिक्स)
- नवदीप (पॅरा अॅथलेटिक्स)
- नितेश कुमार (पॅरा बॅडमिंटन)
- तुलसीमथी मुरुगेसन (पॅरा बॅडमिंटन)
- नित्या श्री सुमती सिवान (पॅरा बॅडमिंटन)
- मनीषा रामदास (पॅरा बॅडमिंटन)
- कपिल परमार (पॅरा जूडो)
- मोना अग्रवाल (पॅरा नेमबाजी)
- रुबीना फ्रान्सिस (पॅरा नेमाबाजी)
- स्वप्निल सुरेश कुसाळे (नेमबाजी)
- सरबजोत सिंग (नेमबाजी)
- अभय सिंह (स्क्वॉश)
- साजन प्रकाश (जलतरण)
- अमन (कुस्ती)
क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार (जीवनगौरव)
- सुच्चा सिंग (अॅथलेटिक्स)
- मुरलीकांत राजाराम पेटकर (पॅरा-स्विमिंग)
द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित श्रेणी)
- सुभाष राणा (पॅरा-नेमबाजी)
- दीपाली देशपांडे (नेमबाजी)
- संदीप सांगवान (हॉकी)
द्रोणाचार्य पुरस्कार (जीवन गौरव)
- एस. मुरलीधरन (बॅडमिंटन)
- अर्मांडो एग्नेलो कोलाको (फुटबॉल)