शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

राष्ट्रीय महिला कबड्डीपटूचा विनयभंग

By admin | Published: June 24, 2015 11:34 PM

येथील बर्रा भागात राहणाऱ्या राष्ट्रीय महिला कबड्डीपटूचा विनयभंग व मारपीट झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांना वैद्यकीय चाचणीमध्ये खेळाडूला

कानपूर : येथील बर्रा भागात राहणाऱ्या राष्ट्रीय महिला कबड्डीपटूचा विनयभंग व मारपीट झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांना वैद्यकीय चाचणीमध्ये खेळाडूला किरकोळ दुखापत झाल्याचे आढळले. परंतु, खासगी वैद्यकीय चाचणीमध्ये नाकाला फ्रॅक्चर झाल्याची माहिती असल्याचे कळते. पोलिसांना हे प्रकरण संशयास्पद वाटत असल्याने सविस्तर तपास करण्यात येत आहे.आठ दिवसांपूर्वी झालेल्या या घटनेसंबंधी पोलिसांनी आरोपींविरोधात अद्याप कोणतीही कारवाई केली नसून किरकोळ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता . मात्र, आता एसएसपीच्या निर्देशानुसार पोलिसांनी आरोपींविरोधात अनेक कलमं वाढवली असून, आरोपींना पकडण्यासाठी एसपी स्तरावरील अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात दोन गट तयार करण्यात आले आहेत.राष्ट्रीय संघात निवड झालेली ही कबड्डीपटू सध्या पालम क्लब दिल्ली येथे सराव करीत आहे. १५ जूनला ती कानपूर येथे आपल्या घरी गेली होती. तेव्हा तेथील उजाला ठाकूर व गांधी या दोन तरुणांनी तिची छेड काढली. यावेळी कबड्डीपटूने त्यांचा विरोध केला. याचा राग मनात धरून या दोन तरुणांनी मोहल्लयातील इतर तरुणांच्या सोबतीने लाठी-काठी घेऊन तिच्या घरात बळजबरीने शिरुन तरुणीच्या कुटुंबियांना मारहाण केली शिवाय सामनाचीही नासधूस केली. या झटापटीत त्या कबड्डीपटूच्या नाकाचे हाड मोडले. शिवाय तिच्या कुटुंबीयांनादेखील किरकोळ दुखापती झाल्या. आरोपींनी तिला व तिच्या कुटुंबीयांना पोलिसांकडे गेल्यास जीवे मारण्याचीही धमकी दिली.घटनेनंतर धाडस करून ती कबड्डीपटू पोलिसांमध्ये तक्रार नोंदवण्यास गेली तेव्हा पोलिसांनी साधारण कलमांतर्गत गुन्ह्याची नोंद केली व आरोपींना पकडण्याचे प्रयत्नसुद्धा केले नाहीत. दुसरीकडे आरोपींकडून होणाऱ्या सततच्या धमक्यांमुळे ती व तिचे कुटुंबीय दहशतीखाली होते. दरम्यान, तिने नंतर एसएसपी शलभ माथुर यांच्याकडे आपबिती कथन केल्यानंतर त्यांनी प्रकरण गांभिर्याने घेत कठोर कारवाईचे आश्वासन दिले. दरम्यान, इतके दिवस शांत राहिल्यानंतर अचानकपणे टीव्ही माध्यमांना याबाबत माहिती दिल्याने पोलिसांना ही घटना संशयास्पद वाटत आहे. एसएसपी माथूर यांनी याबाबत सांगितले की ज्यावेळी ही कबड्डीपटू त्यांना भेटायला आली तेव्हा त्यांनी तिची वैद्यकीय चाचणी केली. ज्यात किरकोळ दुखापती आढळून आल्या. मात्र, तिच्या घरच्यांनी जेव्हा खासगी डॉक्टरकडून तपासणी केली तेव्हा तिच्या नाकाच्या हाडाला फ्रॅक्चर असल्याचे आढळले. शिवाय आता पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात ३२३, ५०४, ५०६, ४५२ आणि ३२५ या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून, त्यांना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन दिले आहे.