इंदौर : आॅलिम्पिकमध्ये दोनदा पदक जिंकणारा आणि तीन वर्षांनंतर पुनरागमन करणारा दिग्गज मल्ल सुशील कुमारने राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिपच्या पुरुषांच्या ७४ किलो वजन गटातील फ्री स्टाइल प्रकारात सुवर्ण पटकावले. विशेष म्हणजे उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम फेरी लढत न खेळताचा बाजी मारली. तिन्ही फेरीत वॉकओव्हर मिळाल्याने सुशीलने सहज वर्चस्व राखले. त्याचवेळी, एकमेव आॅलिम्पिक पदक विजेती महिला मल्ल साक्षी मलिक आणि दबंग गर्ल गीता फोगट यांनीही आपआपल्या गटात सुवर्ण कमाई केली.सुशीलने आपल्या चिरपरिचित अंदाजात सुरुवातीच्या दोन फेºयांतच प्रतिस्पर्ध्याला दोन मिनिटांपेक्षाकमी वेळेत धूळ चारली; परंतु उपांत्यपूर्व उपांत्य आणि अंतिम फेरीत त्याला आव्हान मिळाले नाही.यामुळे संपूर्ण स्पर्धेत सुशील केवळ १ मिनिट ३३ सेकंद एवढाच वेळ कुस्ती खेळला. सुशीलने पहिल्या फेरीत मिझोरामच्या लालमलस्वामा याला अवघ्या ४८ सेकंदात आणि दुसºया फेरीत मुकुल मिश्राला तेवढ्याच अवधीत चीत केले. उपांत्यपूर्व फेरीत त्याला प्रवीणने वॉकओव्हर दिला, तर उपांत्य फेरीत सचिन दहिया त्याच्याविरुद्ध मैदानातच उतरला नाही.महिला गटात, गीताने ५९ किलो वजन गटात शानदार बाजी मारताना रविताचे आव्हान सहजपणे परतावत सुवर्ण पदकावर कब्जा केला. तसेच, साक्षीने ६२ किलो वजन गटात एकतर्फी दबदबा राखताना हरयाणाच्या पूजाचा १०-० असा फडशा पाडत दिमाखत सुवर्ण पदक पटकावले. (वृत्तसंस्था)सुशीलपासून प्रेरणा घेणार-रिओ आॅलिम्पिकमध्ये कास्यपदक जिंकणारी साक्षी मलिक हिची भारताचा स्टार मल्ल सुशीलकुमार याच्याकडून प्रेरणा घेत त्याच्याप्रमाणेच आॅलिम्पिकमध्ये सलग दोन वेळेस पदक जिंकण्याची इच्छा आहे.साक्षी येथे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सहभागी झाली आहे. ती म्हणाली, ‘‘सुशील माझ्यासाठी मोठा प्रेरणास्रोत राहिला आहे. त्याला खेळताना पाहून आपणही आॅलिम्पिक खेळू आणि देशासाठी पदक जिंकू, असा विचार करीत होते. तथापि, मी आता आॅलिम्पिकपदक विजेती आहे; परंतु मला त्याच्यासारखे बनून आॅलिम्पिकमध्ये दोन पदक जिंकण्याचा विक्रम करायचा आहे.’’२00८ च्या बीजिंग व २0१२ च्या लंडन आॅलिम्पिकमध्ये अनुक्रमे कास्य आणि रौप्यपदक जिंकणाºया सुशीलने तीन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर मॅटवर पुनरागमन केले आहे. या स्पर्धेत कुस्तीप्रेमींचे लक्ष हे सुशील आणि साक्षी यांच्यावरच जास्त आहे.साक्षी म्हणाली, ‘‘माझ्या मते, सर्वच वरिष्ठ खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी व्हायला हवे. या स्पर्धेद्वारे आम्ही खेळाच्या जवळ राहतो आणि त्यामुळे आम्हाला खूप काही शिकायला मिळते.’’
राष्ट्रीय कुस्ती : सुशीलने सहज पटकावले सुवर्ण; साक्षी मलिक, गीता फोगट यांनीही मारली बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 12:40 AM