ऑनलाइन लोकमतकिंग्स्टन, दि. २८ : पहिल्या कसोटीत भारताकडून सपाटून मार खाल्ल्यानंतरही वेस्ट इंडिज संघ कठोर मेहनतीच्या बळावर चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधू शकतो, असा विश्वास संघाचे मुख्य कोच फिल सिमन्स यांनी व्यक्त केला.विंडीजच्या खेळाडूंनी त्यांना मनोधैर्य खचू न देता संघर्षाच्या बळावर भारताविरुद्ध सामना जिंकण्याचे उद्दिष्ट बाळगा, असे आवाहन केले.ह्यजमैका आॅब्झर्व्हरह्ण या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सिमन्स म्हणाले,ह्यआम्ही चांगले खेळलो नाही, याची जाणीव खेळाडूंना झाली ही संघाच्या दृष्टीने चांगली बाब आहे. चांगला खेळ केला असता आणि असा पराभव पचविण्याची वेळ आली असती तर काही चुकीचे घडले असा अर्थ निघाला असता. चांगला खेळ झाला नाही हेच खरे. पुढे असे घडू नये याची खबरदारी प्रत्येकखेळाडूला घ्यावी लागेलसिमन्स मागच्या वर्षीपासून संघाचे कोच आहेत. चारपैकी एक कसोटी गमावताच तुम्ही मनोधैर्य गमावू नका. अद्याप तीन सामने शिल्लक आहेत. पराभवास कुठलाही बहाणा नको. आपण कुठे चुकलो इतकाच शोध घ्या. चांगली फलंदाजी व गोलंदाजी का होऊ शकली नाही, याचे आत्मपरीक्षण करा. खेळाडूंनी सर्वच आघाड्यांवर सरस ठरावे इतकीच त्यांच्याकडून मला माफक अपेक्षाराहील.
मालिकेत बरोबरीसाठी मेहनतीची गरज: सिमन्स
By admin | Published: July 28, 2016 6:04 PM