भुवनेश्वर: ऑलिम्पिक स्टार नीरज चोप्रा आणि किशोर जेना हे येथे १५ मे रोजी होणाऱ्या फेडरेशन चषक अॅथलेटिक्सच्या थेट फायनल फेरीत उतरणार आहेत. ७५ मीटर भालाफेकीची पात्रता कारकिर्दीत अनेकदा गाठल्यामुळे या दोघांना थेट फायनलमध्ये प्रवेश देण्यात आला.
ऑलिम्पिक आणि विश्वविजेत्या नीरजने दोहा येथे ८८.८३ तर जेनाने ७६.३१ मीटर भालाफेक केली. त्यामुळे या दोघांना मंगळवारी पात्रता फेरी खेळण्याची सूट देण्यात आली, अशी माहिती भारतीय संघाचे मुख्य कोच राधाकृष्णन नायर यांनी दिली. २६ वर्षांचा नीरज तीन वर्षांनंतर भारतात खेळणार आहे. तो मंगळवारी शहरात दाखल होणार आहे.