जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय अॅथलिट आपली उत्कृष्ट कामगिरी करतील. या खेळाडूंची तयारी गेल्या काही दिवसांपासून जोरात सुरू होती. अॅथलेटिक्स महासंघाने या खेळाडूंना प्रशिक्षणासाठी समुद्रसपाटीपासून उंच असलेल्या ठिकाणी पाठवले होते. धरमशाला (हिमाचल प्रदेश) नंतर, थिम्पू (भूतान) येथे सराव केल्याचा फायदा खेळाडूंना या स्पर्धेत नक्कीच होणार आहे. त्याच बरोबर नवीन परदेशी प्रशिक्षकांची नेमणूक केल्याचा फायदा खेळाडूंना होणार आहे. रशियाचे प्रशिक्षक गलीना बुखारीनाच्या मार्गदर्शनाखाली हिमा दासने सुवर्ण जिंकले. याचबरोबर नीरज चोप्रा, मोहम्मद अनिस, हिमा दास, टिंकू लूका, सीमा पुनिया, सुधासिंग, श्रीशंकर यांच्या कामगिरीकडे लक्ष राहणार आहे. महाराष्टÑाची संजीवनी जाधव जरी पहिल्यांदा आशियाई स्पर्धेत सहभागी होणार असली, तरी तीसुद्धा चांगली कामगिरी करू शकते. याचबरोबर महिलांच्या चार बाय चारशे मीटर रिले संघाकडून सुवर्णपदकांची अपेक्षा आहे. मिश्र रिले स्पर्धेचे मी स्वागत करतो, खेळामध्ये नवीन नियमांमुळे उत्सुकता वाढते. भारतीय मिश्र रिले स्पर्धक चांगली कामगिरी बजावू शकतात.- आदिल सुमारीवाला(अध्यक्ष, भारतीय अॅथलेटिक्स महासंघ)संजीवनी जाधव या वेळेस ५ व १० हजार मीटर शर्यतीत सहभागी होणार आहे. लांब पल्ल्यांच्या धावपटूंचे प्रशिक्षण महासंघाने खास भूतानची राजधानी थिम्पू येथे आयोजित केले होते. समुद्रसपाटीपेक्षा उंच (२५०० मीटर) ठिकाणी सराव म्हणजे स्टॅमिना खूप वाढतो, आॅक्सिजन कमी असल्यामुळे दूर अंतर धावकांना त्याचा फायदा खूप होतो. समुद्रसपाटीपासून उंच असलेल्या जकार्तामध्ये धावताना भारतीय धावपटूंना आपली कामगिरी चांगली करण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. संजीवनी या स्पर्धेत पूर्ण तयारीनीशी ट्रॅकवर उतरेल. तिच्यामध्ये जिद्द आणि चिकाटी खूप आहे. सरावाच्या दरम्यान संघाच्या मुख्य मार्गदर्शकांनी त्यांच्या काही प्रतिस्पर्ध्यांच्या धावण्याची व्हिडीओ क्लप त्यांना दाखविली आहे. संजीवनीच्या धावण्याच्या वेळात खूप सुधारणा झाली आहे. ५ व १० हजार मीटर शर्यतीत तिच्याकडून पदकाची अपेक्षा आहे. याचबरोबर भारतीय संघातील पी. यू. चित्रा, मोनिका चौधरी, निर्मला शेवरान, चिंता यादव, अन्नू राणी, नयना जेम्स यांनी देखील नुकतेच आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगले प्रदर्शन केले आहे. भारतीय महिला खेळाडूंची परिपक्वता आंतरराष्ट्रीय स्तरावर दिसून येत आहे.-विजेंदर सिंग (संजीवनी जाधवचे मार्गदर्शक)आशियाई क्रीडा स्पर्धा-२०२० टोकियो आॅलिम्पिकच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वाची स्पर्धा मानली जात आहे. आशियाई स्पर्धेत चीनसुद्धा नेहमीप्रमाणे आपले सर्वस्व राखण्याच्या प्रयत्नात असणार आहे.काही आफ्रिकी खेळाडू निवासी व्हिसाद्वारे मध्य पूर्व आशियाई देशांचे प्रतिनिधित्व करतात आणि पदकसुद्धा जिंकतात. राष्ट्रकुल व विविध खेळांच्या झालेल्या जागतिक क्रीडा स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे भारतीय खेळाडू या स्पर्धेत चीन, जपान आणि मध्य पूर्व आशियाई देशांच्या आव्हानाला कसे सामोरे जातात, याकडे देशातील क्रीडाप्रेमींना उत्सुकता आहे.एकंदरीत भारतीय संघातील खेळाडू गत आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकतालिकेत वाढ करतील असा सर्वांना विश्वास वाटत आहे.भारतीय संघपुरुष : महंमद अनस (२०० मीटर धावणे), राजीव (४०० मीटर धावणे), जिन्सन जॉन्सन व मनजितसिंग (८०० व १५०० मीटर धावणे), जी. लक्ष्मनन (५ व १० हजार मीटर), अय्यस्वामी व संतोषकुमार (४०० मीटर अडथळा), नवीनकुमार डागर व शंकरलाल स्वामी (३ हजार मीटर स्टीपलचेस), चेतन बी.(उंच उडी), श्रीशंकर (लांब उडी), नीरज चोप्रा, शिवपालसिंग (भाला फेक), मनीषसिंग, इरफान (२० किमी चालणे).महिला : द्युती चंद (१०० मीटर), हिमा दास, द्युती (२०० मीटर), हिमा निर्मला (४०० मीटर धावणे), टिंटू लुका (८०० मीटर), चित्रा, मोनिका (१५०० मीटर), संजिवनी जाधव, एल. सूर्या, (५००० मीटर), संजिवनी, सुर्या (१० हजार मीटर), जे. मुर्मू, अनू राघवन (४०० मीटर अडथळा), सुधासिंग, चिंता (३०० मीटर स्टीपलचेस), नयना, नीना वरकिल लांब उडी व ४ बाय ४०० मीटर रिले, सौम्या बी., खुशबीर कौर (२० किमी चालणे), स्वप्ना बरमन, पूर्णिमा ( हेप्टॅथलॉन), सीमा पूनिया, संदीप कुमारी (थाळी फेक), सरिता सिंग (हातोडा फेक), अन्नू राणी (भाला फेक).आशियाई स्पर्धेतील भारताची कामगिरी5महिला संघाने ४ बाय ४00 मीटर रिलेमध्ये जिंकलेली सुवर्णपदके11पी. टी. उषाने सर्वांत जास्त पदक जिंकली (४ सुवर्ण, ७ रौप्य)13 २०१४ आशियाई क्रीडामध्ये भारताने अॅथलेटिक्स मध्ये जिंकलेली पदके.74 सुवर्णपदके96 रौप्यपदके112 कांस्यपदके
नीरज चोप्रा, मो. आनस, हिमा, संजीवनी पदकाचे प्रमुख दावेदार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 3:42 AM