Neeraj Chopra : भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत इतिहास घडवला आणि त्याच्यावर कौतुकांचा व बक्षीसांचा वर्षाव झाला. २३ वर्षीय भालाफेकपटू नीरजनं ८७.५८ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले. नीरजच्या या सुवर्णकामगिरीनं त्याला स्टार बनवलं... जाहीरातीतही त्यानं क्रिकेटपटू लोकेश राहुलला मागे टाकले. बऱ्याच मॅगझिनच्या फ्रंटपेजवर तो झळकतोय... त्याचं हे पदक भारतासाठी खूप खास ठरल्यानंच त्याच्यावर हा वर्षाव होत आहे. त्यात उद्योगपती आनंद महिंद्रा ( Anand Mahindra) यांनी नीरजला दिलेलं वचन पूर्ण केलं.
मिल्खा सिंग आणि पीटी उषा यांना अनुक्रमे १९६० व १९८४च्या ऑलिम्पिक स्पर्धेत थोडक्यात ऑलिम्पिक पदकानं हुलकावणी दिली होती. १९६० सालच्या रोम ऑलिम्पिकमध्ये काही शतांशच्या फरकाने त्यांचे कांस्य पदक हुकले होते. फोटो फिनिशमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या मॅलकॉल्म स्पेन्सने कांस्यपदक जिंकले. अॅथलेटिक्समध्ये भारतीय खेळाडूला पोडियम ( अव्वल तिघांत) फिनिशमध्ये पाहण्यासाठी १२५ वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. या ऐतिहासिक विजयानंतर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी नीरजला स्पेशल गिफ्ट देण्याचे जाहीर केले होते.
एका ट्विटर युजरनं आनंद महिंद्रा यांना नीरजला Xuv700 गिफ्ट देण्याची मागणी केली होती. त्यावर महिंद्रा यांनी रिप्लाय दिला अन् त्यांनी त्यांच्या कंपनीतील दोन व्यक्तींना टॅग करून नीरजसाठी Xuv700 गिफ्ट म्हणून तयार करण्यास सांगितली होती.