World Athletics Championship - भारताच गोल्डन बॉय नीरज चोप्राने ( Neeraj Chopra) जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारातील पात्रता फेरीत पहिल्याच प्रयत्नात ८८.७७ मीटर लांब भाला फेकून अंतिम फेरीतील जागा पक्की केली. यासह त्याने २०२४ मध्ये पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचेही ( पात्रता मार्क - ८५.५० मीटर) तिकीट पटकावले. भारताच्या डी. पी. मनूने पहिल्यात प्रयत्नात ७८.१० मीटर आणि दुसऱ्या प्रयत्नात ८१.३१ मीटर लांब भाला फेकला. ८३.०० मीटर हा पात्रता मार्क होता अन् नीरजने पहिल्याच प्रयत्नात सर्वात लांब भाला फेकला. जर्मनीच्या ज्युलियन वेबर ८१.०५ मीटरसह टॉपर राहिला, तर गतविजेत्या पीटर अँडरसनला ७८.०२ मीटर लांब भाला फेकता आला.
मागच्या वर्षी जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत त्याने रौप्यपदक जिंकले आणि ल्युसाने डायमंड लीगमध्ये ८९.०८ मीटर भालाफेक करून डायमंड लीग फायनलमधील जागा पक्की केली होती. सप्टेंबरमध्ये झ्युरिच येथे झालेल्या फायनलमध्ये त्याने ८८.४४ मीटरसह बाजी मारली अन् ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला होता.