शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार घराण्यात कटुता; दूर होईल असे वाटत नाही; अजित पवार यांनी प्रथमच व्यक्त केले मत
2
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
3
IND vs SA 3rd T20: टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!!
4
इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
5
Niva Bupa Health IPO : ₹७४ च्या शेअरनं दिला ६% लिस्टिंग गेन; पण जून तिमाहीत थंड होता निवा बुपाचा व्यवसाय, शेअरची स्थिती काय?
6
केंद्रीय मंत्र्यांनी केलं वाचनालयातील पंख्याचं उदघाटन, आता फोटो होताहेत व्हायरल   
7
'शक्तिमान'साठी मुकेश खन्नांनी रणवीर सिंहला केला होता विरोध; म्हणाले, "तो दोन तास..."
8
Share Market Today : घसरणीच्या सत्रांनंतर अखेर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टी वधारला; मिडकॅप-स्मॉलकॅप मध्ये खरेदी
9
अमित ठाकरे यांना मतदान का करावे? ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितले 'हे' 10 मुद्दे
10
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
11
भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
12
...तर त्यांच्या कानाखाली फटाके वाजवा, भाषण करताना राज ठाकरे संतापले, कारण काय?
13
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
14
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
15
भाजपकडून माझा बुथ, सर्वात मजबूत अभियान, नरेंद्र मोदी साधणार महाराष्ट्रातील १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद
16
विशेष लेख: न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष?
17
कोण आहेत कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय, ज्यांना जगही म्हणतं कॅनडियन वॉरन बफे; पद्मश्रीनंही झालाय सन्मान
18
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
19
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
20
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!

'गोल्डन बॉय' नीरज चोप्रावरील शस्त्रक्रिया यशस्वी; दुखापतग्रस्त हाताने खेळलेला 'डायमंड लीग'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 11:35 PM

Neeraj Chopra undergoes surgery: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने डायमंड लीग दुखावलेल्या हाताने पटकवाले होते दुसरे स्थान

Neeraj Chopra undergoes surgery: भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने १४ सप्टेंबरच्या रात्री डायमंड लीग फायनलमध्ये दुखापतग्रस्त हाताने दुसरे स्थान पटकावण्याचा पराक्रम केला. त्याला डायमंड ट्रॉफी जिंकता आली नाही. हाताला झालेली दुखापत हेच त्यामागचे कारण होते. पण आता त्याच्या दुखापतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. नीरज चोप्राच्या हातावर सोमवारी (१६ सप्टेंबर) स्वित्झर्लंडमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. नीरजची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. १५ सप्टेंबरला डायमंड लीगच्या फायनलनंतर नीरजने स्वत: सोशल मीडिया पोस्टद्वारे त्याच्या दुखावलेल्या हाताबाबत खुलासा केला होता.

'डाव्या हाताच्या चौथ्या मेटाकार्पल हाडात फ्रॅक्चर'

फायनलनंतर नीरजने लिहिले होते, '२०२४ चा सीझन संपत असताना, मी वर्षभरात शिकलेल्या सर्व गोष्टी लक्षात ठेवत आहे. त्यात सुधारणा, अपयश, मानसिकता आणि बरेच कंगोरे आहेत. सोमवारी (९ सप्टेंबर) मला सरावाच्या वेळी दुखापत झाली आणि माझ्या डाव्या हाताचे चौथे मेटाकार्पल हाड फ्रॅक्चर झाल्याचे समजले. पण माझ्या टीमच्या (डॉक्टरांच्या) मदतीने मी ब्रुसेल्समध्ये डायमंड लीग फायनल्स खेळलो.

नीरजचा केवळ १ सेंटीमीटर फरकाने पराभव

नीरज चोप्राला ९ सप्टेंबरला सरावादरम्यान ही दुखापत झाली होती. वैद्यकीय पथकाच्या मदतीने तो डायमंड लीगचा अंतिम सामना खेळू शकल्याचे त्याने सांगितले होते. मात्र, तो विजेतेपदापासून वंचित राहिला आणि त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने ८७.८७ मीटर फेक करून विजेतेपद पटकावले. तर नीरजचा सर्वोत्तम थ्रो ८६.४६ होता. म्हणजेच नीरज फक्त १ सेंटीमीटरने मागे राहिला.

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्राparis olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Indiaभारत