जकार्ता : युवा नीरज चोप्रा आशियाई स्पर्धेमध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे. त्याने लौकिकाला साजेशी कामगिरी करताना ८८.०६ मीटरच्या नव्या राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकावले. विशेष म्हणजे यंदाच्या आशियाई स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये भारतीय संघाचा ध्वजवाहक म्हणून भूमिका निभावल्यानंतर नीरजने आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करताना भारताला सुवर्ण यश मिळवून दिले.
चीनच्या लियू क्विझेनने रौप्यपदक पटकावले, पण नीरजच्या तुलनेत तो बराच पिछाडीवर आहे. त्याने ८२.२२ मीटर अंतर गाठले. पाकिस्तानचा अरशद नदीमने ८०.७५ मीटर भालाफेक करीत कांस्यपदकाचा मान मिळवला. राष्ट्रकुल व सध्याच्या आशियाई स्पर्धेतील चॅम्पियन नीरजने सुरुवातीपासून वर्चस्व कायम राखले आणि त्याने स्वत:च्या राष्ट्रीय विक्रमामध्येही सुधारणा केली. त्याने मे महिन्यात डायमंड लीग सीरिजच्या पहिल्या टप्प्यात दोहामध्ये ८७.४३ मीटर अंतरासह विक्रम नोंदवला होता.
विशेष म्हणजे, आशियाई स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये नीरजचा अपवाद वगळता अन्य स्पर्धकांना यंदाच्या मोसमात ८५ मीटरचे अंतर गाठता आले नव्हते. (वृत्तसंस्था)पहिल्या दोन प्रयत्नांत अपयशी ठरल्यानंतर नीरजने तिसऱ्या प्रयत्नात निर्णायक फेक करत मारली बाजीनीरजचे सुवर्णपदक आशियाई स्पर्धेमध्ये भालाफेक स्पर्धेत भारताचे केवळ दुसरे पदक आहे. यापूर्वी १९८२ मध्ये नवी दिल्ली येथे गुरतेज सिंगने कांस्यपदक पटकावले होते.पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये अपयशी ठरलेल्या नीरजने तिसºया प्रयत्नात सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने पहिल्या प्रयत्नात ८३.६ मीटर भालाफेक केली तर दुसºया प्रयत्नात त्याचा फाऊल झाला.चिनी तैपईचा चाओ सुन चेंग याला नीरजचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी मानले जात होते. त्याने गेल्या वर्षी ९१.३६ मीटर अंतराची जबरदस्त भालाफेक केली होती, पण चेंग याला यावेळी ७९.८१ मीटर अंतराची भालाफेक करता आली.यामुळे त्याला पाचव्या स्थानी समाधान मानावे लागले. नीरजच्या नावावर ज्युनिअर विश्वविक्रमाची (८६.९४ मीटर) नोंद आहे. त्याने गोल्ड कोस्ट राष्ट्रकुलमध्ये ८६.४७ मीटरसह सुवर्णपदकाचा मान मिळवला होता.दोहामध्ये त्याने ८५ मीटरचे अंतर पार केले होते आणि आशियाई स्पर्धेमध्ये सहभागी होण्यापूर्वी फ्रान्स व फिनलँडमध्ये त्याने अनुक्रमे ८५.१७ व ८५.६९ मीटर भालाफेक केली होती. हेच सातत्य कायम राखत आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरजने आपला दबदबा निर्माण केला.