लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शनिवारी रात्री मुंबईत झालेल्या प्रो बॉक्सिंग लढतीत भारताचा स्टार बॉक्सर विजेंदर सिंग याने चीनच्या जुल्फिकर मैमतअली याला नमवून दुहेरी विजेतेपद पटकावले. त्याचवेळी, अन्य लढतीत अखिल कुमार आणि जितेंदर कुमार या भारतीय बॉक्सर्सनी देखील आपआपल्या लढती जिंकून व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये विजयी पदार्पण केले. त्याचप्रमाणे अनुभवी बॉक्सर नीरज गोयत याने आपल्या डब्ल्यूबीओ आशिया वेल्टरवेट विजेतेपदाचा यशस्वी बचाव करताना फिलिपाइन्सच्या अॅलन तनाडाला नमवले.वरळी येथील एनएससीआय स्टेडियममध्ये विजेंदर सिंगने बाजी मारण्याआधी झालेल्या लढतींमध्ये अखिल, जितेंदर आणि नीरज आपले वर्चस्व राखले. बीजिंग आॅलिम्पिकच्या उपांत्यपुर्व फेरीपर्यंत धडक मारलेल्या अखिलने आपल्या व्यावसायिक कारकिर्दिची यशस्वी सुरुवात करताना आॅस्टेÑलियाच्या टाय गिलख्रिस्टला ज्यूनिअर वेल्टरवेट गटात तांत्रिक नॉकआऊट केले. लढतीच्या सुरुवातीलाच अखिलच्या डाव्या डोळ्याखाली दुखापत झाली. मात्र, लगेच यातून स्वत:ला सावरताना त्याने गिलख्रिस्टवर जबरदस्त वर्चस्व राखले. अखिलच्या धडाक्यापुढे गिलख्रिस्टने तिसºया फेरीआधीच गुडघे टेकले. त्याचप्रमाणे, जितेंदरने लाइटवेट गटात थायलंडच्या लिखितकामपोर्नविरुद्ध तांत्रिक नॉकआऊटच्या जोरावर विजय मिळवला.यानंतर, नीरजने जबरदस्त कामगिरी करताना अॅलन तनाडाला नमवले. १२ फेºयांच्या या रोमांचक लढतीत नीरजने आपल्या अनुभवाच्या जोरावर तनाडाला फारशी संधी दिली नाही. नीरज उत्कृष्ट पंच करतानाच, बचावाचेही शानदार प्रदर्शन करत तांत्रिक गुणांच्या जोरावर बाजी मारले. तिन्ही परिक्षकांनी अंतिम निकाल नीरजच्या पक्षात देत ११९-१०९, ११९-१०९, ११८-११० अशा गुणांनी नीरजला विजयी घोषित केले.तत्पुर्वी झालेल्या काही लढतींमध्ये असफ आसिफ, कुलदीप धांडा आणि धरमेंद्र ग्रेवाल या भारतीयांनीही आपआपल्या लढतीत बाजी मारली. असादने फिलिपाइन्सच्या लॅरी अब्बाराला धक्का दिला. कुलदीपने भारताच्याच सचिन भोतविरुद्ध विजय मिळवला. तसेच, धरमेंद्रने अटीतटीच्या लढतीत आॅस्ट्रेलियाच्या आयसाक स्लेड याला नमवले. यानंतरच्या लढतीत भारताच्या प्रदीप खरेरा यानेही विजय मिळवताना थायलंडच्या वांफिचित सिरिफना याला नॉकआऊट केले.हिंदी - चीनी भाई भाई : विजेंदर सिंगस्टार बॉक्सर विजेंदर सिंग याने भारत - चीन यांच्यामध्ये सुरु असलेला वाद संपण्याची इच्छा व्यक्त करतानाच आपला चीनी प्रतिस्पर्धी जुल्फिकर मैमतअलीविरुद्ध मिळवलेले जेतेपद त्याला परत करण्याचा प्रस्ताव पुढे केला. प्रो बॉक्सिंगमध्ये दुहेरी जेतेपद पटकावल्यानंतर विजेंदरने भारत-चीन सीमेवर शांतता राखण्याचे आवाहन केले.विजेंदर म्हणाला की, ‘मी हे विजेतेपद भारत - चीन यांच्या मैत्रीसाठी समर्पित करत आहे. सध्या सुरु असलेला सीमावाद समाप्त व्हावा असे मला वाटते. मी जिंकलेले विजेतेपद शांती राखण्यासाठी समर्पित करत आहे. हे जेतेपद मैत्रीसाठी आहे. हिंदी - चीनी भाई भाई.’
नीरज गोयतने आपले विजेतेपद राखले, प्रो बॉक्सिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2017 4:04 AM