ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - सध्या सोशल मिडियाच्या जगात सर्वच खेऴाडू आघाडीवर असल्याचे दिसून येत आहेत. मात्र याला एक खेळाडू अपवाद ठरला आहे.
बंगऴुरुमध्ये गेल्या आठवड्यात भारत-पाक सामन्यानंतर एका पत्रकार परिषदेत भारताचा गोलंदाज आशिष नेहरा याला सोशल मिडियाबात प्रश्न विचारला गेला. यात त्याने पत्रकारांना असे उत्तर दिले की, तुम्ही मला चुकीचा प्रश्न विचारला असून मी सोशल मिडियाचा वापरत करत नसल्याचे सांगितले.
तसेच, त्याने मी नोकियाचा जुना फोन वापरत असून मी फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर नसल्याचे सांगितले. याचबरोबर मी वर्तमानपत्रे सुद्धा वाचत नाही, असे आशिष नेहरा याने यावेळी सांगितले.
त्याच्या वक्तव्यानंतर बीसीसीआयने त्याला सोशल मिडियात आणण्याचे ठरविले असून त्याची जबाबदारी माजी खेऴाडू विरेंद्र सेहवागकडे सोपविली आहे. दरम्यान, याप्रकरणी विरेंद्र सेहवागने आशिष नेहराला सोशल मिडियात आणण्यास प्रयत्न करु असे सांगितले आहे.