शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरलं! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
2
भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय बदल होतात? नागपूरकरांनी लढलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी
3
"मला संपवू नका, मीच राहिलो नाही, तर तुम्ही...", अशोक चव्हाणांचे विधान चर्चेत
4
...तर शरद पवारांसोबत चर्चा करू; MIM च्या मविआतील प्रवेशावर ठाकरे गटाची भूमिका
5
खळबळजनक! "तुमची मुलगी एका..."; डिजिटल अरेस्ट, ८ कॉल, 'त्या' फोनने आईला हार्ट अटॅक
6
अभिजात दर्जासाठी पहिली समिती ते आतापर्यंतचा प्रवास... अखेर तेव्हापासूनच्या प्रयत्नांना यश
7
आता GPay युझर्सना मिळणार Gold Loan; 'या' कंपनीसह झाला करार, पाहा डिटेल्स
8
"असं केलं, तर महाराष्ट्रात आरक्षणाचा वाद राहणार नाही", शरद पवारांनी काय सुचवला मार्ग?
9
शेअर बाजार उघडताच पुन्हा विक्री सुरू, सेल ऑन राइजमध्ये अडकला बाजार; BPCL, एशियन पेंट्स आपटला
10
MIM ची मविआत एन्ट्री?, काँग्रेस-राष्ट्रवादीला लेखी प्रस्ताव; २ बैठका सकारात्मक
11
मराठीला 'अभिजात भाषेचा दर्जा'; शरद पवारांनी केंद्राचे केले अभिनंदन, म्हणाले...
12
'गोलीगत' सूरजसाठी सुप्रिया सुळे मैदानात! बिग बॉसचा महाविजेता करण्यासाठी बारामतीकरांना केलं आवाहन
13
करामती Rashid Khan 'ते' वचन विसरला! क्रिकेटरनं ३ भावांसह एकाच मांडवात उरकलं लग्न
14
मोदी सरकारची नवी स्कीम, १ कोटी तरुणांना महिन्याला ₹५००० मिळणार; कधी, केव्हा, कसा कराल अर्ज?
15
मराठी भाषेला अभिजात दर्जा, राज ठाकरेंनी केलं स्वागत; या निर्णयाचा फायदा सांगितला
16
Bigg Boss 18: बॉलिवूड सुंदरी घेणार घरात एन्ट्री, ९० च्या दशकातील ही 'सेन्सेशनल क्वीन' कोण?
17
इस्त्रायलची मोठी कारवाई! बेरुतही स्फोटांनी हादरला, हिजबुल्लाहचा नवा चीफ सफीद्दीन टारगेटवर
18
संपादकीय: इराणने का उडी घेतली? पडसाद अमेरिकेतील निवडणुकीत
19
मोठी बातमी! मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, चालक गंभीर, पिकअपला दिली धडक
20
सत्तार दोन तास उशिरा आले, कार्यक्रम सोडून गेले! बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत गदारोळ

नेपाळचा खळबळजनक विजय

By admin | Published: July 20, 2016 9:22 PM

क्रिकेटमध्ये धडपडत उभे राहण्याचा प्रयत्न करीत असलेल्या नेपाळ संघाने क्रिकेटविश्वातील खळबळजनक निकाल नोंदवताना थेट मेरिलेबोन क्रिकेट क्लबला (एमसीसी) एकदिवसीय

एमसीसीला नमवले : क्रिकेटची पंढरी लॉर्डसवर केला पराक्रम

लंडन : क्रिकेटमध्ये धडपडत उभे राहण्याचा प्रयत्न करीत असलेल्या नेपाळ संघाने क्रिकेटविश्वातील खळबळजनक निकाल नोंदवताना थेट मेरिलेबोन क्रिकेट क्लबला (एमसीसी) एकदिवसीय सामन्यात ४१ धावांनी लोळवले. या अनपेक्षित निकालाने क्रिकेटविश्वाचे लक्ष नेपाळने वेधून घेतले आहे.जागतिक क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉडर््स मैदानावर पहिला वहिला सामना खेळताना नेपाळने प्रथम फलंदाजी करताना २१७ धावांची समाधानकारक मजल मारली. नेपाळकडून ज्ञानेंद्र मल्ला (३९) आणि कर्णधार पारस खडका (३०) यांनी दमदार फलंदाजी केली. नेपाळ व इंग्लंड यांच्यातील द्विपक्षीय संबंधांनी २०० वर्ष पुर्ण झाल्यानिमित्तान आयोजित करण्यात आलेल्या या सामन्यात नेपाळने सर्वांनाच चकीत करताना खळबळ माजवली. फलंदाजीनंतर अचूक गोलंदाजीनेही नेपाळने लक्षवेधी खेळ केला. विशेष म्हणजे सुमारे ५ हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या या सामन्यात केवळ नेपाळचाच जयघोष होत होता. नेपाळने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना एमसीसीचे फलंदाज नेपाळच्या फिरकीपटूंपुढे ढेपाळले. अडायरचा अपवाद वगळता एमसीसीचा एकही फलंदाज फारवेळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. फिरकीपटूंनी केलेल्या अचूक माऱ्यापुढ एमसीसीचा डाव केवळ १७६ धावांत संपुष्टात आला. सागर पुन आणि बसंता यांनी प्रत्येकी ३ बळी घेताना एमसीसीचे कंबरडे मोडले. (वृत्तसंस्था)लॉडर््स मैदानावर मिळालेल्या या अप्रतिम विजयामुळे संघात उत्साह निर्माण झाला आहे. दरवेळी लॉडर््सवर खेळण्याची संधी मिळत नसते आणि त्यात हा विजय खूप महत्त्वपूर्ण ठरतो. माझ्यामते आम्ही स्वत:वर विश्वास ठेवला आणि शानदार खेळ केला. या विजयामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल.- पारस खडका, कर्णधार - नेपाळ