नवी दिल्ली : टीम इंडियाबाहेर आपल्याला कधीच यशाचे श्रेय मिळाले नाही, असे मत लॉर्ड्स कसोटीत भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा याने व्यक्त केले आह़े
इंग्लंडविरुद्धच्या दुस:या कसोटीत 74 धावांच्या बदल्यात 7 गडी बाद करून भारताला सहज विजय मिळवून देणा:या ईशांतने बीसीसीआय टीव्हीला सांगितले, की आखूड टप्प्याचा चेंडू टाकण्यासाठी मला किती मेहनत घ्यावी लागते, याकडे लोकांचे लक्ष नाही़ मात्र, मला अशा प्रकारची गोलंदाजी करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली आह़े यापुढेही कामगिरीत सातत्य राखण्याचा प्रयत्न राहील, असेही त्याने सांगितल़े
ईशांतला इंग्लंडविरुद्धच्या दुस:या कसोटीतील पहिल्या डावात एकही गडी बाद करता आला नव्हता़ त्यामुळे तो टीकाकारांचे लक्ष्य होता़ मात्र, दुस:या डावात 7 गडी बाद केल्यामुळे चोहीबाजूंनी त्याचे कौतुक होत आह़े
ईशांतने पुढे सांगितले, की भारतीय संघातील खेळाडूंव्यतिरिक्त कुणीच माङया खेळाचे कौतुक करीत नाही़ मात्र, आता इंग्लंडविरुद्ध केलेल्या कामगिरीमुळे सर्वच कौतुक करीत आहेत; परंतु मी 7 गडी बाद केले म्हणून हे कौतुक होत आह़े मी 8क् षटके जुन्या चेंडूने बॉउंसर टाकले, याचे कुणीही कौतुक केले नाही, याची खंत असल्याचेही तो म्हणाला़
आता मला याची सवय झाली आह़े त्यामुळे माङयावर कोण टीका करीत आहे आणि कोण नाही़ याच्याकडे मी लक्ष देत नाही़ भारतीय संघातील खेळाडूंचा, तसेच कर्णधाराचा माङया कामगिरीवर विश्वास आह़े त्यामुळे यापुढेही कामगिरीत सातत्य राखण्याचा प्रयत्न करणार आहे, असेही ईशांत म्हणाला़ (वृत्तसंस्था)