शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

पुणे, गुजरात संघांमुळे स्पर्धेत नवा उत्साह

By admin | Published: April 20, 2016 3:21 AM

जीवनात सर्वांत महत्त्वाची बाब आहे आव्हानाला संधी समजण्याची क्षमता असणे. काही चुकीचे घडले तर नकारात्मक विचार मनात घर करतात

जीवनात सर्वांत महत्त्वाची बाब आहे आव्हानाला संधी समजण्याची क्षमता असणे. काही चुकीचे घडले तर नकारात्मक विचार मनात घर करतात. पण, यात काही वेगळे करून मार्ग शोधला तर परिस्थिती सोपी होते आणि सकारात्मक निकाल मिळतात. क्रिकेटच्या भाषेत सांगायचे झाल्यास जर एखादा गोलंदाज तुमच्यावर बाऊन्सरचा मारा करीत असेल तर त्या चेंडूला सीमारेषा दाखविण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. ज्या वेळी आयपीएलचे दोन चॅम्पियन संघ चेन्नई सुपरकिंग्ज व राजस्थान रॉयल्स यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली त्या वेळी आयोजक अडचणीत आले होते. पण, आयोजक परिस्थितीला यशस्वीपणे सामोरे गेले आणि चोख प्रत्युत्तर दिले. त्यासाठी त्यांची प्रशंसा करायलाच पाहिजे. आयपीएलच्या नवव्या पर्वाला जवळजवळ १० दिवस झाले असून, दोन नव्या फ्रॅन्चायसी संघांमुळे स्पर्धेत नवा उत्साह संचारला आहे. रायझिंग पुणे सुपरजायंट्समध्ये चेन्नईची झलक दिसते. धोनीच्या नेतृत्वाखालील कुठलाही संघ नेहमीच तुल्यबळ प्रतिस्पर्धी असतो. या संघात अजिंक्य रहाणे, फाफ डू प्लेसिस, केविन पीटरसन, धोनी आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यासारखे अव्वल पाच फलंदाज आहेत, तर गोलंदाजी आक्रमणही संतुलित आहे. गुजरात लायन्स संघातही जागतिक दर्जाच्या फलंदाजांचा समावेश आहे. अ‍ॅरोन फिंच, ब्रँडन मॅक्युलम, सुरेश रैना, ड्वेन ब्राव्हो आणि रवींद्र जडेजा या पाच फलंदाजांनी आपली छाप सोडली आहे. काही दिग्गज फ्रॅन्चायसी संघांनी या स्पर्धेत संथ सुरुवात केली आहे, पण प्रत्येक संघ तुल्यबळ प्रतिस्पर्धी आहे. ही स्पर्धा म्हणजे स्प्रिंट नसून मॅरेथॉन आहे. येथे सामन्यागणिक तुम्हाला रणनीती तयार करावी लागते. जो संघ फार पुढचा विचार करतो त्या संघाला त्याची झळ सोसावी लागू शकते. टी-२० क्रिकेटमध्ये अनुभवाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. वेगवान क्रिकेटमध्ये काही चेंडू जय-पराजयातील अंतर स्पष्ट करतात. त्यामुळे प्रत्येक संघाला अडचणीच्या स्थितीत संयम राखून संघाला पैलतीर गाठून देणाऱ्या खेळाडूंची गरज असते. झहीर खान त्याचे उत्तम उदाहरण आहे. त्याने २०००मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय दर्जाचा क्रिकेटपटू म्हणून आपली ओळख निर्माण केली. त्याने ९२ कसोटी आणि २०० वन-डे सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. आता वयाच्या ३७व्या वर्षी तो दिल्ली डेअरडेव्हिल्ससाठी चांगला कर्णधार ठरत आहे. आरसीबीचा विचार करता आम्ही ‘झहीर अ‍ॅण्ड कंपनी’विरुद्ध पराभूत झाल्यामुळे निराश झालो आहोत, पण आयपीएलच्या नवव्या पर्वात यशस्वी ठरण्यासाठी कशाची गरज आहे, याची आम्हाला चांगली कल्पना आहे.(टीसीएम)