ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - भारताची रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा ही फिरकी जोडी सध्या जगभरातील फलंदाजांच्या नाकी दम आणत आहे. या दोघांचेही संघात स्थान पक्के असल्याने तिसऱ्या फिरकी गोलंदाजाल संघात स्थान मिळवणे तसे कठीणच बनले आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान भारताचा अजून एक लेगस्पिनर सज्ज होत आहे. हा तिसरा फिरकी गोलंदाज दुसरा तिसरा कुणी नसून, दस्तुरखुद्द भारताचा कर्णधार विराट कोहली आहे.
विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारशी गोलंदाजी केलेली नाही. मात्र सध्या विराट आपल्या गोलंदाजीची धार वाढवण्यासाठी मेहनत घेत आहे. खुद्द बीबीसीआयनेच हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये विराट कोहली एका फलंदाजाला गोलंदाजी करताना दिसत आहे. विराटची गोलंदाजीची शैली शैन वॉर्नशी मिळतीजुळती असल्याचेही दिसते. बीसीसीआयने हा व्हिडिओ शेअर करताना भारतीय संघात नवा लेग स्पिनर, अशी कॅप्शन या व्हिडिओला दिली आहे. आता विराटमधील असामान्य गुणवत्ता पाहता तो गोलंदाजीमध्येही लवकरच वाकबगार होणार यात शंका नाही. अधिक वाचा : युवीची फटकेबाजी अन् पाकिस्तानचे सरेंडर!
दरम्यान, सध्या सुरू असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तानला नमवून दमदार सुरुवात केली आहे. आता पुढच्या लढतीत भारताचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. त्या लढतीत विजय मिळवल्यास भारताचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होईल .
New leggie in the house - @imVkohli. What say @ShaneWarne ? #INDvPAK#CT17#TeamIndiapic.twitter.com/xf2F8ZbVLo— BCCI (@BCCI) June 4, 2017