जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 48 लाख 18,676 इतकी झाली आहे. त्यापैकी 3 लाख 16,953 रुग्ण दगावले असले तरी 18 लाख 64,118 रुग्ण बरे झाले आहेत. या कोरोना व्हायरसचा जन्म ज्या वुहान शहरातून झाला, त्यांनी या व्हायरसवर मात करण्यात यश मिळवले आहे. कोरोना व्हायरस नक्की कसा व केव्हा पसरला, याबाबत अजून चर्चा सुरूच आहेत. नोव्हेंबर महिन्यात हा व्हायरस पसरल्याचे चीननं कबुल केलं होतं. पण, फ्रान्सची खेळाडू एलोडीए क्लोऊव्हेलनं ऑक्टोबर महिन्यातच चीनमध्ये हा व्हायरस पसरल्याचा धक्कादायक खुलासा केला.
गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात वुहान येथे जागतिक मीलेटरी स्पर्धा खेळवण्यात आली होती आणि त्या स्पर्धेत 100 हून अधिक देशांतील 10 हजार स्पर्धक सहभागी झाले होते. त्यावेळीच अनेक खेळाडू आजारी पडले आणि काही कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्नही झाले. 31 वर्षीय एलोडीए आणि तिचा 27 वर्षीय बॉयफ्रेंड व्हॅलेंटीन बेलौड यांना या स्पर्धेदरम्यान कोरोनाची लागण झाली होती. इटालियन तलवारबाज मॅटेओ टॅगलिआरिओल यानेही त्या स्पर्धेत माझ्यात कोरोनाची लक्षण दिसल्याचा दावा केला आहे. त्यानंतर तो त्याच्या मुलाला आणि गर्लफ्रेंडलाही झाला.
जर्मनीची व्हॉलीबॉलपटू जॅकलीन बॉकने सांगितले की,''वुहानमध्ये दाखल झाल्यानंतर काही दिवसांतच अनेक खेळाडू आजारी पडले. त्यात माझाही समावेश होता. मी अशी आजारी कधी पडली नव्हती. मला प्रचंड सर्दी झाली होती. ते कोरोनाचीच लक्षणं होती.''
चीनमध्ये डिसेंबरमध्ये पहिला कोरोना रुग्ण आढळल्याचा दावा केला जात आहे. पण, लक्सेनबर्गच्या ऑलिव्हर जॉर्जने सांगितले की,''ऑक्टोबरमध्येच वुहानच्या रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला होता. भूतांच्या शहरात आलोय की काय असं वाटत होतं.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
मर्यादा ओलांडू नकोस, अन्यथा तुझी लायकी दाखवून देईन; आफ्रिदीच्या विधानानंतर हरभजन सिंग भडकला
22 कोटींना घेऊन आलास, तरी काश्मीर आमचाच होता अन् राहणार; 'गब्बर'नं आफ्रिदीला खडसावलं
सध्याच्या परिस्थितीत IPL 2020 होणं अवघड, BCCIनं मांडलं परखड मत
भीक मागून जगणाऱ्या तुझ्या देशासाठी काहीतरी कर; सुरेश रैनानं आफ्रिदीला जागा दाखवली