शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
3
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
4
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
5
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
6
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
7
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
8
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
9
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
10
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
11
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
12
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
13
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
14
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
15
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
16
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
17
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
18
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
19
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
20
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी

फुटबॉलमधील नवे आश्चर्य; सातव्या सेकंदाला नोंदवला पहिला गोल!

By admin | Published: October 12, 2016 6:46 AM

विश्वचषक पात्रता फेरीच्या जिब्राल्टरविरुद्धच्या सामन्यात बेल्जियमच्या ख्रिश्चन बेन्टेके या खेळाडूने खेळ सुरु झाल्यापासून सातव्या सेकंदाला पहिला गोल

ब्रुसेल्स : विश्वचषक पात्रता फेरीच्या जिब्राल्टरविरुद्धच्या सामन्यात बेल्जियमच्या ख्रिश्चन बेन्टेके या खेळाडूने खेळ सुरु झाल्यापासून सातव्या सेकंदाला पहिला गोल नोंदवून सोमवारी रात्री नवा विक्रम प्रस्थापित केला.विश्वचषक पात्रता सामन्यांमधील याआधीचा सर्वात जलद गोल खेळ सुरु झाल्यापासून ८.३ सेकंदाला केला गेला होता. १९९३ मध्ये सॅन मरिनो या टिकलीएवढ्या बेटाच्या संघातील डेव्हिड गॉल्तियेरी याने हा गोल इंग्लंडसारख्या मातब्बर संघाविरुद्ध नोंदविला होता.क्लबच्या पातळीवर झालेल्या सामन्यांमध्ये पूर्वी याहूनही झटपट गोल झालेले असल्याने फुटबॉल या खेळाच्या इतिहासातील हा सर्वात जलदगती गोल नसला तरी खुद्द विश्वचषक स्पर्धेत किंवा पात्रता फेऱ्यांमधील सर्वाधिक जलद म्हणून बेन्टेकेच्या गोलची नोंद झाली.खेळातील कौशल्य म्हणूनही बेन्टेकेचा हा गोल जादुई म्हणावा असा होता. खेळाला सुरुवात (प्ले आॅफ) जिब्राल्टरने केली. त्यांच्या खेळाडूने हाफ लाइनवर ठेवलेला चेंडू बेल्जियमच्या हाफमध्ये ढकलला. त्यानंतर जेमतेम दोन खेळाडूंनी चेंडू पास केला आणि बेन्टेकेकडे आलेला चेंडू त्याने थेट जिब्राल्टरच्या गोलमध्ये टोलवला. बिच्चारा जिब्राल्टरचा गोली ग्लव्हज आणि पॅडस ठिकठाक करत पवित्रा घेण्याच्या आत चेंडू गोलपोस्टमध्ये शिरून जाळीवर आदळला होता.बेल्जियमच्या राष्ट्रीय संघात खेळताना बेन्टेकेने याआधीच्या ५६२ दिवसांत एकही गोल केला नव्हता. संघासाठी सुमारे पावणे दोन वर्षांत त्याने केलेला हा गोल ऐतिहासिक ठरला. बेन्टेके याने नंतर ४८व्या व ५६ व्या मिनिटाला आणखी दोन गोल करून हॅटट्रिक पूर्ण केली. दरम्यान १९ व्या आणि ५१व्या मिनिटाला इतरांनी दोन गोल केले होते. ७९ व्या मिनिटाला शेटवचा गोल झाला आणि जिब्राल्टरचा ६-० असा दारूण पराभव झाला. हा सामना पोर्तुगालमधील पारो या शहरात झाला. पण दुर्दैव असे की, फूटबॉलमधील हा ‘अजूबा’ पाहायला हाताच्या बोटावर मोडण्याइतकेच प्रेक्षक हजर होते. जिब्राल्टरचा संघ त्यांच्या देशापासून ४०० किमी अंतरावर हा सामना खेळत होता. गेल्या मेमध्ये ‘फिफा’ची मान्यता मिळाल्यानंतर जिब्राल्टरचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होता. (वृत्तसंस्था)सात सेकंदे म्हणजे कमालच झाली!च्‘फिफा’च्या क्रमवारीत बेल्जियमचा संघ दुसऱ्या तर जिब्राल्टरचा अगदी शेवटच्या म्हणजे २०५ व्या स्थानावर आहे. त्यामुळे तुम्ही म्हणाल की, अशा टुकार संघाविरुद्ध बलाढ्य संघाने असा झटपट गोल केला यात काय मोठसे? पण प्रतिस्पर्धी होण होते याने या गोलचे महत्व कमी होत नाही. च्कारण सात सेकंद म्हणजे किती कमी वेळ याचा विचार करा. अहो, आपल्याला साधा रस्ता ओलांडायला किंवा जेवताना एक घास तोंडात घेऊन चावायलाही याहून जास्त वेळ लागतो!