शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

विजेतेपदाने करणार नव्या वर्षाची सुरुवात - जोकोविच

By admin | Published: January 03, 2016 1:32 AM

वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा आॅस्टे्रलियन ओपनसाठी स्वत:ला आजमवण्यासाठी सोमवारपासून सुरू होणाऱ्या कतार ओपन स्पर्धेत जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू नोव्हाक जोकोव्हिच खेळेल.

दोहा : वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा आॅस्टे्रलियन ओपनसाठी स्वत:ला आजमवण्यासाठी सोमवारपासून सुरू होणाऱ्या कतार ओपन स्पर्धेत जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू नोव्हाक जोकोव्हिच खेळेल. या स्पर्धेत जोकोसह इतर नामांकित खेळाडूही सहभागी होणार असल्याने यंदाच्या मोसमातील सुरुवातीला जागतिक टेनिसचा धडाका पाहायला मिळेल.आॅस्टे्रलियन ओपनची पूर्वतयारी म्हणून जोको कतार ओपनमध्ये विजेतेपदासाठी खेळेल. त्याचवेळी स्पेनचा बलाढ्य खेळाडू राफेल नदाल, टॉमस बेर्दीच आणि डेव्हीड फेरर यांसारखे मातब्बर खेळाडूही या स्पर्धेत खेळणार असल्याने जोकोसमोर खडतर आव्हान असेल. तरीदेखील गतवर्षी विजेतेपदांचा धडाका लावलेल्या जोकोच्या कामगिरीवर टेनिसप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळेच जोको यंदाच्या मोसमाची सुरुवात विजयाने करतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. गेल्या वर्षी जोकोला करियर स्लॅम नोंदवण्याची सुवर्णसंधी होती. तुफान फॉर्ममध्ये असलेल्या जोकोने गतवर्षी आॅस्टे्रलियन, विम्बल्डन आणि यूएस ओपन विजेतेपदांवर कब्जा केला होता. फ्रेंच ओपनच्या फायनलमध्येही जोकोने धडक मारली होती. मात्र या स्पर्धेत त्याला स्वित्झर्लंडच्या स्टेनिसलास वावरिंकाने धक्का दिला होता. या दिमाखदार कामगिरीसह जोको चारही ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा टेनिस इतिहासातील तिसरा खेळाडू ठरला होता. २०१६ साली यशस्वी कामगिरी करण्यासाठी मी पूर्ण सज्ज असल्याचे सांगून प्रतिस्पर्धी खेळाडूंना त्यानेही एकप्रकारचा इशाराच दिला आहे. गतवर्षी नदाल आपल्या कारकिर्दीत प्रथमच १०व्या स्थानी फेकला होता. त्याची आतापर्यंतची सर्वांत खराब कामगिरी ठरली. (वृत्तसंस्था)चार ग्रँडस्लॅमचा निर्धार....मेलबर्न येथे १८ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या आॅस्टे्रलियन ओपनसाठी जोको विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. त्याचबरोबर जागतिक क्रमवारीतील या अव्वल खेळाडूचा यंदा चारही ग्रँडस्लॅम पटकावण्याचा निर्धार असेल. जोकोविच कामगिरी करण्यास यशस्वी ठरला तर तो रॉड लेवरनंतरचा पहिला खेळाडू ठरेल. लेवरने १९६९मध्ये चारही विजेतेपद पटकावले होते. यंदाच्या आॅलिम्पिकमध्ये सुवर्ण पटकावण्याचा प्रयत्नही जोकोकडून होईल. नवा मोसम सुरू होत असून, कोर्टवर परतल्याने मी खूप उत्साहित झालो आहे. मोसमातील पहिल्याच स्पर्धेत विजेतेपद पटकावण्याचा माझा पूर्ण प्रयत्न असेल. - नोव्हाक जोकोविच, सर्बिया