माऊंट मौनगानुई : कोरी अँडरसनच्या अवघ्या ४१ चेंडूंतील ९४ धावांच्या तडाखेबंद खेळीच्या बळावर न्यूझीलंडने बांगलादेशला तिसऱ्या ट्वेंटी २0 सामन्यात २७ धावांनी पराभूत करीत त्यांचा सफाया केला.अँडरसनने केन विलियम्सन (६0) याच्या साथीने चौथ्या गड्यासाठी १२४ धावांची भागीदारी केली आणि आपल्या खेळीदरम्यान १0 षटकार ठोकले. हा न्यूझीलंडसाठी विक्रम आहे. त्याच्या खेळीने न्यूझीलंडने ४ बाद १९४ धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ २0 षटकांत ६ बाद १६७ धावाच करू शकला. तमीम इकबाल आणि सौम्या सरकारने ५ षटकांत ४४ धावांची भागीदारी केली होती; परंतु तमीम २४ धावांवर बाद झाला. त्यामुळे बांगलादेशने १0 षटकानंतर २ फलंदाज ८९ धावांवर गमावले. सरकारही ४२ धावा काढून तंबूत परतला. त्यानंतर ते धावगती वाढवू शकले नाहीत. बांगलादेश या दौऱ्यात आता दोन कसोटी खेळणार आहे. त्यांना सर्वच वनडे आणि तीन टी २0 मध्येही पराभवाची चव चाखावी लागली. (वृत्तसंस्था)
न्यूझीलंडने केला बांगलादेशचा सफाया
By admin | Published: January 09, 2017 12:51 AM