शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

न्यूझीलंड-बांगलादेशसाठी ‘करा किंवा मरा’ लढत

By admin | Published: June 09, 2017 4:03 AM

न्यूझीलंड आणि बांगलादेश संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अखेरच्या लढतीत आज शुक्रवारी ‘करा किंवा मरा’ या इराद्याने खेळणार आहेत

कार्डिफ : न्यूझीलंड आणि बांगलादेश संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अखेरच्या लढतीत आज शुक्रवारी ‘करा किंवा मरा’ या इराद्याने खेळणार आहेत. या सामन्यात बाजी मारणारा संघ ‘अ’ गटातून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहे. गुणतालिकेत न्यूझीलंड चौथ्या तसेच बांगलादेश तिसऱ्या स्थानावर आहे. उभय संघांचा प्रत्येकी एक गुण आहे. दोघांना इंग्लंडने पराभवाची चव चाखविली तर आॅस्ट्रेलियाविरुद्ध पावसामुळे दोन्ही संघांना एका गुणावर समाधान मानावे लागेल. यजमान इंग्लंडने दोन सहज विजयांसह उपांत्य फेरीत आधीच धडक दिली आहे. आॅस्ट्रेलियाने अखेरच्या साखळी सामन्यात इंग्लंडला नमविल्यास हा संघ देखील उपांत्य फेरीचा दावेदार होऊ शकतो. न्यूझीलंड आणि बांगलादेश या संघांना विजय मिळविण्यासोबतच आॅस्ट्रेलियाच्या इंग्लंडवरील विजयासाठी प्रार्थना करावी लागेल. दरम्यान पाऊस समीकरणे बिघडवू शकतो. न्यूझीलंड संघ आॅस्ट्रेलियाविरुद्ध अपयशी ठरला. चांगली स्थिती असताना पावसामुळे गुणविभागणीवर समाधान मानावे लागले. बांगलादेश मात्र पावसामुळे आॅस्ट्रेलियाकडून पराभूत होता होता बचावला. न्यूझीलंडचे पारडे सामन्यात जड वाटत असले तरी बांगलादेशला सहज घेता येणार नाही. अलीकडे मर्यादित षटकांच्या सामन्यात त्यांनी कमाल केली आहे. कर्णधार केन विलियम्सन याच्या कामगिरीवर न्यूझीलंडची भिस्त असेल.(वृत्तसंस्था)उभय संघ यातून निवडणारन्यूझीलंड : केन विलियम्सन (कर्णधार ), कोरी अ‍ॅण्डरसन, ट्रेंट बोल्ट, नील ब्रूम, कोलिन डी ग्रॅण्डहोम, मार्टिन गुप्तिल, टॉम लेथम, मिशेल मॅक्लेनघन, अ‍ॅडम मिल्ने, जेम्स नीशाम, जीतन पटेल, ल्यूक रोंची, मिशेल सेंटनर, टिम साउदी आणि रॉस टेलर.बांगलादेश: मूशर्रफ मुर्तजा (कर्णधार), शाकिब अल हसन, मुशकिफूर रहमान, तमीम इक्बाल, मोहम्मद महमदुल्लाह, शब्बीर रहमान, रुबेल हुसेन, सौम्या सरकार, तास्किन अहमद, मुस्तफिजूर रहमान, इमरुल कायेस, मेहदी हसन, मोसादेक हुसेन, सुंजामुल इस्लाम आणि शफीउल इस्लाम.