शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

न्यूझीलंड -लंका सामना

By admin | Published: February 14, 2015 11:50 PM

९८ धावांनी मात : फलंदाजांची कमाल; गोलंदाजांचीही धमाल

९८ धावांनी मात : फलंदाजांची कमाल; गोलंदाजांचीही धमाल
न्यूझीलंडकडून लंकेची शिकार

ख्राईस्टचर्च : न्यूझीलंडने विश्वचषकाच्या सलामीला शनिवारी गत उपविजेत्या लंकेची ९८ धावांनी शिकार केली. न्यूझीलंडच्या ३३२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणार्‍या लंकेचा डाव ४६.१ षटकांत सर्वबाद २३३ धावांत आटोपला.
लंकेकडून कुणीही फलंदाज फारसा चमकला नाही. सलामीचा लाहिरु तिरिमाने याने सर्वाधिक ६५ तसेच कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने ४६ धावा केल्या. न्यूझीलंडकडून कोरी ॲण्डरसन, डॅनिअल व्हे˜ोरी, टिम साऊदी, ॲडम मिल्ने आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. व्हे˜ोरीने दहा षटकांत केवळ ३४ धावा दिल्या.
त्याआधी यजमान संघाकडून ॲण्डरसनने ७५, कर्णधार ब्रँडन मॅक्यूलम ६५, केन विलियम्सन ५७ आणि मार्टिन गुप्तिल ४६ यांच्या धडाकेबाज खेळीच्या बळावर न्यूझीलंडने ६ बाद ३३१ धावा उभारल्या. पाठलाग करणार्‍या लंकेकडून तिरिमाने- दिलशान यांनी सलामीला १३ षटकांत ६७ धावा ठोकल्या. अनुभवी व्हे˜ोरीने दिलशानचा आपल्याच चेंडूवर झेल घेत पहिला धक्का दिला. कुमार संगकाराने ३९ धावा केल्या. यादरम्यान त्याने विश्वचषकात हजार धावा पूर्ण केल्या तसेच वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्यात दुसर्‍या स्थानावर झेप घेतली. व्हे˜ोरीने अनुभवी माहेला जयवर्धनेला भोपळा न फोडू देता रोंचीकडे झेल देण्यास बाध्य केले. संगकारा पायचित झाल्याने लंकेची स्थिती ४ बाद १२९ झाली होती. मिल्नेने करुणारत्ने १४ आणि मेंडिस ४ यांना एकाच षटकात टिपले. ३३ व्या षटकांत कुलसेकरा बाद झाला. लंकेला दहा षटकांत विजयासाठी १२३ धावांची गरज होती पण ४२ व्या षटकांत साऊदीने कर्णधार मॅथ्यूजला बाद करताच विजयाच्या आशा मावळल्या.
त्याआधी नाणेफेक गमविल्यानंतर फलंदाजी मिळालेल्या न्यूझीलंडकडून मॅक्यूलम- गुप्तिल यांनी १५.५ षटकांत १११ धावांची सलामी दिली. या जोडीने लसिथ मलिंगाच्या चार षटकांत ४२ धावा वसूल करताच त्याला हटविण्यात आले. त्याने दहा षटकांत एकूण ८४ धावा मोजल्या. मॅक्यूलम व गुप्तिल बाद झाल्यानंतर ॲण्डरसनने ४६ चेंडू टोलवित आठ चौकार, दोन षटकारांसह संघाच्या ३०० धावा पूर्ण केल्या. त्याने रोंचीसोबत (नाबाद २९) सहाव्या गड्यासाठी ७३ धावांची भागीदारी केली. लंकेकडून मेंडिस आणि लकमल यांनी प्रत्येकी दोन तर हेरथ आणि कुलसेकरा यांनी एकेक गडी बाद केला.(वृत्तसंस्था)
..........................................................