ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १ - टी-२० विश्वचषकाचा रणसंग्रामास आज पासून सुरवात होत आहे. प्रारंभीचा सामना भारत - न्युझीलंड यांच्या दरम्यान नागपूर येथे खेळवला जात आहे. न्युझींलड संघाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आज पर्यंत भारत-न्युझीलंड दरम्यान ४ टी२० चे सामने झाले आहेत. या चारीही सामन्या त्यांनी भारतावर मात केली आहे. आज होणाऱ्या भारतीय संघात कोणाताही बदल केला नाही . आशिया चषक जिंकणारा संघ कायम ठेवण्यात आला आहे.
जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात असलेल्या भारतीय संघाला अलीकडच्या यशस्वी कामगिरीच्या बळावर टी-२० विश्वचषकातील न्यूझीलंडविरुद्ध आज मंगळवारी सलामी लढत जिंकून विजयी वाटचाल करण्याचे आव्हान असेल. या सामन्यासाठी असलेली खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल असल्याचे मानले जात आहे.
न्यूझीलंडने लंकेवर पहिल्या सराव सामन्यात ७४ धावांनी विजय साजरा केला. इंग्लंडकडून दुसऱ्या सामन्यात मात्र त्यांना सहा गड्यांनी पराभव पत्करावा लागला होता. कर्णधार केन विल्यम्सन, मार्टिन गुप्टिल, हेन्री निकोल्स, रॉस
टेलर, कॉलिन मुन्रो, कोरी अॅन्डरसन आणि ग्रांट इलियट हे प्रभावी फलंदाज संघात आहेत. इश सोधी, अॅन्डरसन आणि वेगवान गोलंदाज अॅडम मिल्ने हे भारताला कोंडीत पकडू शकतात.
आफ्रिकेविरुद्ध धवनने ७३ आणि विंडीजविरुद्ध रोहितने ९८ धावा केल्या. हे पाहता आघाडीच्या फलंदाजांवर बरेच काही विसंबून राहील. हे फलंदाज लवकर बाद झाले तर डाव कोसळण्याची भीती आहे. २००९, २०१० आणि २०१२ च्या विश्वचषकात उपांत्य फेरीदेखील गाठू न शकण्यामागील कारणही फलंदाजीतील अपयश हेच राहिले. २०१४ मध्ये लंकेने भारताला अंतिम लढतीत नमविले होते. धोनी, युवराज, रैना, विराट, रहाणे, रवींद्र जडेजा, रविचंद्रन आश्विन आणि भुवनेश्वर कुमार हे मागच्या विश्वचषकातही संघात होते. या सर्वांचा अनुभव यंदा उपयुक्त ठरेल.
प्रतिस्पर्धी संघ
भारत - महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, युवराज सिंग, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन आश्विन, जसप्रीत बुमराह, आशीष नेहरा
न्युझीलंड - केन विल्यम्सन (कर्णधार), मार्टिन गुप्टिल, ल्यूक रोंची, रॉस टेलर, कॉलीन मुन्रो, मिशेल सेंटनेर,नाथन क्युलम, ग्रांट इलियट, टीम साउदी, ईश सोधी, कोरी अॅन्डरसन.