शहरं
Join us  
Trending Stories
1
Team India Arrival LIVE: वर्ल्ड कप ट्रॉफी घेऊन टीम इंडिया मायदेशी पोहोचली, पंतप्रधान मोदींची भेट घेणार
2
कापूस उत्पादकांना हेक्टरी पाच हजार, सोयाबीन उत्पादकांनाही मदत; सरकारची घाेषणा
3
कंगना राणौतला कानशिलात लगावणाऱ्या CISF कॉन्स्टेबलची बदली? भावाने सांगितलं सत्य
4
पहिल्या वर्गाचा तिसरा दिवस, शाळेच्या स्वच्छतागृहात विजेच्या धक्क्याने चिमुकलीचा मृत्यू
5
Amazonचे शेअर्स विक्रमी उच्चांकावर, ५ अब्ज डॉलर्सचे शेअर्स विकणार फाऊंडर Jeff Bezos
6
"मला माफ करा, मी हे सर्व एका महिन्यात..."; चोरी केल्यावर चोराने लिहिली चिठ्ठी, दिलं वचन
7
Justin Bieber in Mumbai : जगातील सर्वात श्रीमंत पॉप सिंगर मुंबईमध्ये दाखल, अंबानीच्या लेकाच्या संगीत सोहळ्यात जस्टिन बीबर करणार परफॉर्म!
8
Hathras News: हातरसच्या भोले बाबांचा 13 एकरात 5 स्टार आश्रम, इतक्या कोटींची आहे मालमत्ता
9
मायदेशी परतताच टीम इंडियाचा जल्लोष! हॉटेलबाहेर केला भांगडा, रोहित-सूर्या-पांड्याचा व्हिडिओ व्हायरल
10
'ठिपक्यांची रांगोळी' फेम अप्पूला लॉटरी! ज्ञानदा रामतीर्थकरची हिंदी वेब सीरिजमध्ये वर्णी
11
शेअर बाजारात पुन्हा गॅप अप ओपनिंग; हिंदाल्को, ICICI Bank मध्ये तेजी; HDFC मध्ये प्रॉफिट बुकिंग
12
टीम इंडिया दिल्लीत पोहोचली, कोहली-रोहितची पहिली झलक; विमानतळापासून हॉटेलपर्यंत चाहत्यांचा जल्लोष
13
झिकाचा वाढतोय धोका, राज्यात आठ रुग्ण; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी
14
Hathras Stampede : 23 वर्षांपूर्वी भोले बाबांना झालेली अटक; मृत मुलीला जादूने जिवंत करण्याचा केला होता दावा
15
भारतातील श्रीमंत जे स्वत:च होते वर्ल्ड बँक; 'जगत शेठ' होते सर्वात श्रीमंत व्यक्ती, इंग्रज आणि मुघलही घ्यायचे कर्ज
16
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य : ४ जुलै २०२४; आनंदवार्ता मिळणार, प्रियजनांची भेट होणार
17
शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवेंच्या निलंबनाचा कालावधी कमी करणार?; आज होणार निर्णय
18
‘लाडकी बहीण’ योजनेत अडवणूक कराल तर...खबरदार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा
19
८० हजार जणांना परवानगी, सत्संगाला आले अडीच लाख लोक: आयोजकांवर पुरावे दडविल्याचा आरोप

विलियम्सनच्या शतकाने न्यूझीलंड विजयी

By admin | Published: January 17, 2017 7:46 AM

न्यूझीलंडने बांगलादेशविरुद्ध सोमवारी पाचव्या व अखेरच्या दिवशी संपलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात सात गडी राखून विजय मिळविला.

वेलिंग्टन : कर्णधार केन विलियम्सनने कारकिर्दीतील झळकावलेल्या १५ व्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने बांगलादेशविरुद्ध सोमवारी पाचव्या व अखेरच्या दिवशी संपलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात सात गडी राखून विजय मिळविला. विलियम्सन व रॉस टेलर यांनी निर्धारित वेळेपूर्वी संघाला लक्ष्य गाठून दिले. त्यांनी प्रती षटक सहाच्या सरासरीने धावा फटकावताना तिसऱ्या विकेटसाठी १६३ धावांची भागीदारी केली आणि न्यूझीलंडला २१७ धावांचे लक्ष्य गाठून दिले.न्यूझीलंडचा कर्णधार विलियम्सनने नाबाद १०४ धावांची खेळी केली, तर टेलर ६० धावा काढून बाद झाला. हेन्री निकोल्स ४ धावा काढून नाबाद राहिला. बांगलादेशने या लढतीत सुरुवातीचे चार दिवस वर्चस्व गाजविले. बांगलादेशचा दुसरा डाव ५८ षटकांत १६० धावांत संपुष्टात आला. कर्णधार मुशफिकर रहीम वेगवान गोलंदाज टीम साऊदीच्या गोलंदाजीवर जायबंदी झाला. त्याला रुग्णालयात जावे लागले. बांगलादेशने पहिला डाव ८ बाद ५९५ धावसंख्येवर घोषित केला होता. पहिल्या डावात सर्वाधिक धावसंख्या नोंदविल्यानंतरही पराभव स्वीकारण्याचा अनोखा विक्रम त्यांच्या नावावर नोंदविला गेला. यापूर्वीचा विक्रम १२० वर्षांपूर्वीचा होता. त्यावेळी आॅस्ट्रेलियाला इंग्लंडविरुद्ध १८८४ मध्ये सिडनी येथे ५८६ धावा फटकावल्यानंतरही पराभव स्वीकारावा लागला होता. (वृत्तसंस्था)>मुशफिकरला रुग्णालयातून सुटीवेलिंग्टन : बांगलादेशचा कर्णधार मुशफिकर रहीमला रुग्णालयातून सुटी मिळाली आहे. पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान टीम साऊदीच्या बाऊन्सरवर तो जायबंदी झाला होता. बांगलादेश संघाचा प्रवक्ता म्हणाला, ‘मुशफिकरचा रुग्णालयामध्ये एक्स-रे काढण्यात आला. त्याची दुखापत गंभीर नाही. मुशफिकर दुखापत झाल्यानंतर बराचवेळ खेळपट्टीवर होता. उभय संघातील वैद्यकीय स्टाफने त्याच्यावर उपचार केले. त्यानंतर रुग्णवाहिकेमधून त्याला रुग्णालयात नेण्यात आले.