शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
2
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
3
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
4
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
5
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
6
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
7
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
8
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
10
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
11
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
12
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
13
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
14
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
15
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
16
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
17
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
18
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
19
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु

खेळपट्टीमुळे न्यूझीलंडचा सराव सामना रद्द

By admin | Published: October 30, 2015 10:26 PM

आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंडदरम्यान पुढील महिन्यापासून कसोटी मालिकेचे आयोजन होत आहे. या मालिकेआधी आॅस्ट्रेलिया एकादशविरुद्ध सरावासाठी उतरलेल्या न्यूझीलंड संघाला शुक्रवारी खेळ सुरू

मेलबोर्न : आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंडदरम्यान पुढील महिन्यापासून कसोटी मालिकेचे आयोजन होत आहे. या मालिकेआधी आॅस्ट्रेलिया एकादशविरुद्ध सरावासाठी उतरलेल्या न्यूझीलंड संघाला शुक्रवारी खेळ सुरू होताच माघारी फिरावे लागले. ब्लॅकटाऊन ओव्हलची खेळपट्टी खराब होताच सामना रद्द करावा लागला.सिडनी शहराच्या पश्चिमेस असलेल्या ब्लॅकटाऊन ओव्हलवर सीए एकादश आणि न्यूझीलंड संघादरम्यान सराव सामना होणार होता. पण खेळपट्टीवर मोठ्या भेगा असल्याने ही खेळपट्टी जागोजागी उखडली होती. खेळपट्टीची अवस्था बघून अखेर सामना गुंडाळावा लागला. २९ ते ३१ आॅक्टोबर दरम्यानच्या या सामन्यात शुक्रवारी दुसऱ्या दिवशी खेळ सुरू होताच गुंडाळण्यात आला. यजमान संघाने तोपर्यंत १२१.१ षटकांत तब्बल ५०३ धावा ठोकल्या व डाव घोषित केला. सलामीवीर रेयॉन कार्टर आणि अ‍ॅरोन फिंच यांनी प्रथमश्रेणी सामन्यात सलामीचा ५०३ धावांचा विक्रम नोंदविला. कार्टर २०९ आणि फिंचने नाबाद २८८ धावा ठोकल्या. या कामगिरीमुळे दोन्ही सलामीवीरांनी याआधी आॅस्ट्रेलियाकडून सलामीला केलेल्या ४५६ धावांच्या भागीदारीचा विक्रम मोडीत काढला. १९२३-२४ साली एर्नी मायने आणि बिल पोंसफोर्ड यांनी व्हिक्टोरिया स्टेटसाठी ही विक्रमी भागीदारी केली होती. सलामीचा विश्वविक्रम पाकचे वहीद मिर्झा-मन्सूर खान यांच्या नावे आहे. या दोघांनी १९७६-७७ साली प्रथमश्रेणी सामन्यात ५६१ धावांची भागीदारी केली होती. हा विक्रम आज मोडीत निघाला असता पण न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज वॉटलिंग याने कार्टरला बाद केले. लंच ब्रेकनंतर न्यूझीलंड संघ खेळण्यासाठी आला नाही. क्रिकेटसाठी ही खेळपट्टी अनफिट असल्याने सामना रद्द करण्यात आला. (वृत्तसंस्था)