ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 11 - सुरुवातीच्या धक्क्यानंतर शाकीब अल हसन (76) आणि कर्णधार मुशाफीकुर रहीम (36) यांनी बांगलादेशचा डाव सावरला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद 93 धावांची भागीदारी केली असून, बांगलादेशची धावसंख्या 200 च्या पुढे गेली आहे.
अजूनही बांगलादेशचा संघ 480 पेक्षा जास्त धावांनी पिछाडीवर आहे. त्यांचे चार गडी बाद झाले आहेत. भारताने पहिल्या डावात 6 बाद 687 धावा केल्या. महमदुल्ला इशांत शर्माने 28 धावांवर पायचीत पकडले. त्यानंतर शाकीब हसन आणि रहीमची जोडी जमली.
पहिल्या डावात धावांचा डोंगर उभारणा-या भारताने तिस-या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर बांगलादेशला दोन धक्के दिले आहेत. काल दिवसअखेर बांगलादेशच्या 1 बाद 41 अशी स्थिती होती.
सकाळच्या सत्रात आणखी तीन धावांची भर घातल्यानंतर तमीम इक्बाल 25 धावांवर धावबाद झाला. त्यानंतर मेमीनुल हकला उमेश यादवने 12 धावांवर पायचीत पकडले. त्याआधी कर्णधार विराट कोहलीची (204) व्दिशतकी खेळी, मुरली विजय (108) आणि वृद्धीमान सहाचे नाबाद (106) शतक यांच्या फलंदाजीच्या बळावर भारताने पहिल्या डावात 6 बाद 687 अशी विराट धावसंख्या रचली.