शहरं
Join us  
Trending Stories
1
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
2
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
3
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
4
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
5
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
6
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
7
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
8
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
9
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
10
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
11
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
12
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
13
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
14
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
15
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
16
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत
17
“वाढत्या लोकप्रियतेमुळेच घाबरलेल्या भाजपाकडून राहुल गांधींना धमक्या”; काँग्रेसची टीका
18
मोसादही पाहत राहिल... ना मिसाईल, ना बाँब; घातक एनर्जी वेव्हजचे शस्त्र भारताच्या हाती लागणार
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, पीएम विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमाची वर्ध्यात जोरदार तयारी

निहार म्हस्केची शानदार हॅट्ट्रिक

By admin | Published: June 14, 2016 3:34 AM

स्ट्राइकर निहार म्हस्के याने मोक्याच्या वेळी केलेल्या तीन गोलच्या जोरावर शेलार एफसी संघाने एकतर्फी विजय मिळवताना आय. सॉ. कोल्ट संघाचा ३-० असा फडशा पाडून बोरीवली

मुंबई : स्ट्राइकर निहार म्हस्के याने मोक्याच्या वेळी केलेल्या तीन गोलच्या जोरावर शेलार एफसी संघाने एकतर्फी विजय मिळवताना आय. सॉ. कोल्ट संघाचा ३-० असा फडशा पाडून बोरीवली प्रीमियर फुटबॉल लीग स्पर्धेत विजयी सलामी दिली. तसेच रुथलेस एफसी संघानेही दणदणीत विजय सलामी देताना कॅस्टल बॉइज एफसी संघाला २-० असे नमवले.बोरीवली स्पोटर््स फाउंडेशनच्या वतीने सेंट फ्रान्सीस डी’अ‍ॅसीस मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत शेलार संघाने आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर आयसी संघाला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला निहारने वेगवान गोल करत शेलार संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर २८ व्या मिनिटाला त्याने दुसरा गोल करत संघाची आघाडी मजबूत केली. या वेळी आयसी संघाकडून जोरदार प्रत्युत्तराची अपेक्षा होती. मात्र दडपणाखाली आल्यामुळे आयसी संघाकडून काही चुका झाल्या आणि त्याचा अचूक फायदा घेत पुन्हा एकदा निहारने गोल करून शानदार हॅट्ट्रिकसह संघाची आघाडी ३-० अशी भक्कम केली. या जोरावर मध्यांतराला शेलार संघाने एकहाती वर्चस्व राखले.दुसऱ्या डावात आयसी संघाने पुनरागमनाचा काहीसा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही. अखेर मजबूत बचावाच्या जोरावर आयसीच्या आक्रमकांना रोखताना शेलार संघाने सहज विजय मिळवला.अन्य सामन्यात रुथलेस एफसी संघाने सांघिक खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करताना कॅस्टल बॉइज संघाचे आव्हान २-० असे परतावले. कीगान परेरा याने नवव्याच मिनिटाला गोल करून संघाला आघाडीवर नेल्यानंतर डेन परेरा याने ३७व्या मिनिटाला गोल करून संघाची आघाडी २-० अशी केली. ही आघाडी कायम राखत रुथलेसने बाजी मारली. (क्रीडा प्रतिनिधी)