नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या निखिल माळी, प्रवीण पाटील, जगदीश रोकडे, भाग्यश्री फंड यांनी आपआपल्या वजन गटात प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून पहिल्या खेलो इंडिया १७ वर्षांखालील गटात कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. कुस्तीमध्ये महाराष्ट्राच्या मल्लांनी ४ सुवर्ण, ५ रौप्य आणि ९ कांस्यपदकांची लयलूट केली. महाराष्ट्र संघ रविवारपर्यंत १६ सुवर्ण, १६ रौप्य व २० कांस्य असे एकूण ५२ पदकांसह तिस-या क्रमांकावर आहे.केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या वतीने नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींना व्हॉलीबॉलमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यात त्यांना पश्चिम बंगालविरुद्ध २८-२६, २५-१८, २५-१० गुणांनी पराभव पत्कारावा लागला. मुलींच्या संघाला अजित पाटील आणि मालती पोटे तर पदकविजेत्या कुस्तीमल्लांना लक्ष्मीकांत यादव, संदीप वांजळे आणि दत्ता माने यांनी मार्गदर्शन केले. बॅडमिंटनमध्ये महाराष्ट्राच्या मालवीका बनसोडेने तमिळनाडूच्या व्ही. सरुमतीचा २१-१०, २१-१७ गुणांनी पराभूत करून पुढच्या फेरीत प्रवेश केला.दुसरीकडे तनिष्कादास पांडेने तमिळनाडूच्या बी. बी. बिम्बायला २१-११, २१-११ असे नमविले. मुलांच्या गटात मात्र सुधांशू भूरेला दिल्लीच्या आकाश यादवकडून ९-२१, ८-२१ असा पराभवाचा सामना करावा लागला.>अंतिम निकालमुले फ्री स्टाइल : निखिल माळी (४२ किलो गट, सुवर्ण), कृष्णा घोडके (४२ कि. कास्य), विनायक रोकडे (५० कि. कांस्य), प्रवीण पाटील (५० कि. सुवर्ण), संजीव (६९ कि. कांस्य), वेताल शेळके (७६ कि. रौप्य); मुले ग्रीकोरोमन : जगदीश रोकडे (४२ कि. सुवर्ण), अमोल बोगाडे (४२ कि. कांस्य), विनायक पाटील (५० कि. कांस्य), पार्थ कंदारे (५४ कि. रौप्य), रोहण भोसले (५८ कि. रौप्य); मुली : महिमा राठोड (४३ कि. रौप्य), दिशा कारंडे (५६ कि. रौप्य), भाग्यश्री फंड (५२ कि. सुवर्ण), सोनाली मंडलिक (४६ कि. कांस्य), श्रुति भोसले (६० कि. कांस्य), हर्षदा जाधव (६५ कि. कास्य), विश्रांती पाटिल (६५ कि. कांस्य).
निखिल, प्रवीण, जगदीश, भाग्यश्रीला सुवर्ण, कुस्तीमध्ये महाराष्ट्राला ४ सुवर्ण, ५ रौप्य, ९ कांस्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 3:38 AM