Nishad Kumar : पॅरालिम्पिक स्पर्धेत दुसरे 'रौप्य', निषादच्या उंच उडीने वाढवली देशाची शान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 06:06 PM2021-08-29T18:06:28+5:302021-08-29T18:20:25+5:30

Nishad Kumar : निषादने दमदार कामगिरी करत पहिल्या 3 मध्ये स्थान मिळवले होते. आज त्याची अमेरिकेतील 2 खेळाडूंशी स्पर्धा होती. त्यात, निषादने रौप्य पदकाला गवसणी घातली. 

Nishad Kumar : Nishad's second silver medal at Paralympics in tokiyo, PM modi congras nishad kumar | Nishad Kumar : पॅरालिम्पिक स्पर्धेत दुसरे 'रौप्य', निषादच्या उंच उडीने वाढवली देशाची शान

Nishad Kumar : पॅरालिम्पिक स्पर्धेत दुसरे 'रौप्य', निषादच्या उंच उडीने वाढवली देशाची शान

Next
ठळक मुद्देनिषादने मिळवलेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन निषादचे अभिनंदन केले आहे. निषाद एक विलक्षण धावपटू आहेत, त्यांनी कौशल्याच्या जोरावर उल्लेखनीय खेळ केला. त्यांचे अभिनंदन... असे ट्विट मोदींनी केले आहे.   

नवी दिल्ली - टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेतून भारतीयांना आनंद देणारी आणखी एक बातमी आली आहे. भारताच्या निषाद कुमारने चमकदार कामगिरी करत इतिहास रचला. निषादने उंच उडीत देशासाठी रौप्य पदक जिंकलं आहे. निषादने दमदार कामगिरी करत पहिल्या 3 मध्ये स्थान मिळवले होते. आज त्याची अमेरिकेतील 2 खेळाडूंशी स्पर्धा होती. त्यात, निषादने रौप्य पदकाला गवसणी घातली. 

निषादने मिळवलेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन निषादचे अभिनंदन केले आहे. निषाद एक विलक्षण धावपटू आहेत, त्यांनी कौशल्याच्या जोरावर उल्लेखनीय खेळ केला. त्यांचे अभिनंदन... असे ट्विट मोदींनी केले आहे.   


निषाद मूळचा हिमाचल प्रदेशच्या उना येथील रहिवाशी आहे. पॅरालिम्पिक स्पर्धेपूर्वी त्याने बंगळुरूच्या कोचिंग कॅम्पमध्ये मोठा सराव केला होता. त्याच्या या यशानंतर त्याच्या गावात जल्लोष साजरा केला जात आहे. 

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्याकडूनही अभिनंदन

भाविना पटेलचीही रौप्य कमाई

टोकियोत सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची टेबल टेनिसपटू भाविना पटेल हिला Class 4 च्या अंतिम फेरीत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. Class 4 च्या अंतिम लढतीत भाविनाचा सामना चीनच्याच यिंग झोयूशी झाला आहे. भावनाच्या विजयानंतर देशभरातून तिचं कौतुक होत आहे. तसेच, तिच्यावर बक्षिसांचा वर्षावही सुरू आहे. गुजरात सरकारने तिच्या चंदेरी कामगिरीची दखल घेत राज्य सरकारकडून 3 कोटी रुपये बक्षीस जाहीर केलं आहे. 

Web Title: Nishad Kumar : Nishad's second silver medal at Paralympics in tokiyo, PM modi congras nishad kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.