नवी दिल्ली - टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेतून भारतीयांना आनंद देणारी आणखी एक बातमी आली आहे. भारताच्या निषाद कुमारने चमकदार कामगिरी करत इतिहास रचला. निषादने उंच उडीत देशासाठी रौप्य पदक जिंकलं आहे. निषादने दमदार कामगिरी करत पहिल्या 3 मध्ये स्थान मिळवले होते. आज त्याची अमेरिकेतील 2 खेळाडूंशी स्पर्धा होती. त्यात, निषादने रौप्य पदकाला गवसणी घातली.
निषादने मिळवलेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन निषादचे अभिनंदन केले आहे. निषाद एक विलक्षण धावपटू आहेत, त्यांनी कौशल्याच्या जोरावर उल्लेखनीय खेळ केला. त्यांचे अभिनंदन... असे ट्विट मोदींनी केले आहे.
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्याकडूनही अभिनंदन
भाविना पटेलचीही रौप्य कमाई
टोकियोत सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची टेबल टेनिसपटू भाविना पटेल हिला Class 4 च्या अंतिम फेरीत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. Class 4 च्या अंतिम लढतीत भाविनाचा सामना चीनच्याच यिंग झोयूशी झाला आहे. भावनाच्या विजयानंतर देशभरातून तिचं कौतुक होत आहे. तसेच, तिच्यावर बक्षिसांचा वर्षावही सुरू आहे. गुजरात सरकारने तिच्या चंदेरी कामगिरीची दखल घेत राज्य सरकारकडून 3 कोटी रुपये बक्षीस जाहीर केलं आहे.