नवी दिल्ली: जगात सर्वात वेगवान धावपटू म्हणून ओळख असणाऱ्या जमैकाचा उसेन बोल्टचा विक्रम मोडणाऱ्या भारताचाकर्नाटकमधील धावपटू श्रीनिवास गौडाने अनेक भारतीयांची मनं जिंकली होती. तसेच प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी देखील श्रीनिवासची स्तुती करत देशाला ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकवून देऊ शकतो अशी आशा व्यक्त केली होती. मात्र कंबालामधील धावपटू निशांत शेट्टीने श्रीनिवासचा विक्रमाला मागे टाकत नवीन विक्रम आपल्या नाववर केला आहे.
कंबाला स्पर्धेतील धावपटू निशांत शेट्टीने 143 मीटरचं अंतर केवळ 13.68 सेकंदात पार केलं आहे. निशांतने पार केलेल्या 143 मीटर अंतराची आणि वेळेची तुलना जर 100 मीटर अंतरासोबत केली तर निशांतने 100 मीटरचं अंतर केवळ 9.51 सेकंदामध्ये पार केलं असल्याचे दिसून येते. त्यामुळे श्रीनिवास गौडाला 100 मीटरचं अंतर पार करण्यासाठी 9.55 सेकंदचा वेळ लागला होता. मात्र निशांतने श्रीनिवासचा हा विक्रम मोडीत काढत 100 मिटरचं अंतर केवळ 9.51 सेकंदात पार केलं आहे.
कर्नाटकमध्ये कंबाला जॉकी ही पारंपरिस स्पर्धा खेळवली जाते. या स्पर्धेमध्ये बैलांच्या जोडीबरोबर धावायचे असते. जो सर्वात कमी वेळात ठराविक अंतर पूर्ण करेल, त्याला विजेता म्हणून घोषित केले जाते. श्रीनिवासने या स्पर्धेत 9.55 सेकंदामध्ये 100 मीटरचं अंतर पार केले होते. यानंतर केंद्र सरकारने श्रीनिवासला ट्रायलसाठी बोलवले होते. मात्र साई ट्रायलनूसार श्रीनिवासने केंद्र सरकारची ही ऑफर धुडकावून लावली होती.
उसेन बोल्टचा विश्वविक्रम मोडणाऱ्या Srinivas Gowdaने मोदी सरकारच्या ऑफरला दिला नकार