शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

नितीन सिंग, श्रीजित सेन, लेस्टन वाझ दुसऱ्या फेरीत

By admin | Published: May 30, 2016 8:12 PM

महाराष्ट्राचे श्रीजित सेन, लेस्टन वाझ व हरयाणाचा नितीन सिंग यांनी चुरशीच्या झालेल्या लढतीत आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून सोलारिस क्लब अखिल भारतीय अव्वल

अखिल भारतीय मानांकन टेनिस : यशराज दळवी, प्रथम भुजबळ, कुश ओरिया पराभूतपुणे : महाराष्ट्राचे श्रीजित सेन, लेस्टन वाझ व हरयाणाचा नितीन सिंग यांनी चुरशीच्या झालेल्या लढतीत आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून सोलारिस क्लब अखिल भारतीय अव्वल मालिका (सुपर सिरीज) टेनिस (१४ वर्षांखालील) स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला.कोथरूड येथील क्लबच्या टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या स्पर्धेत पहिल्या फेरीत तिसऱ्या मानांकित नितीन सिंगने पुण्याच्या यशराज दळवीचा ६-७(२), ६-३, ६-२ गुणांनी पराभव केला. यशराजने पहिला सेट ७-६(२) असा जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये ३-० अशी आघाडी घेतली होती; पण नंतर नितीनने जिगरबाज खेळ प्रदर्शन करून विजयश्री खेचून आणली. आठव्या मानांकित श्रीजित सेन यालाही विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. श्रीजितने प्रथम भुजबळचा ४-६, ६-३, ६-४ असा पराभव केला. लेस्टन वाझने कुश ओरियाचा ६-७(६), ६-४, ६-३ असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. मुलींच्या गटामध्ये अग्रमानांकित बेला ताम्हणकरने स्नेहा रानडेचा ६-२, ६-३ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून विजयी सलामी दिली. परी सिंगने मृण्मयी भागवतला ६-०, ६-१ असे सहज नमविले. राधिका महाजनने श्रीचंद्रा तेन्तूला ६-४, ६-४ असे पराभूत केले. निकाल : (मुख्य ड्रॉ) मुले : पहिली फेरी : ध्रुव तांगरी (१) वि.वि. अमन दहीया ६-३, ६-४; प्रांजल तिवारी वि.वि. रोहन फुले ६-0, ६-२; आर्यन कुरेशी वि.वि. माणिक शौर्य ६-२, ६-२; गिरीश चौगुले (६) वि.वि. वीर शहा ६-0, ७-५; नितीन सिंग (३) वि.वि. यशराज दळवी ६-७(२), ६-३, ६-२; सर्वेश बिरमाने वि.वि. सुमीर श्रीवास्तव ६-३, ६-४; मयांक जोशी वि.वि. अन्मय देवराज ६-२, ६-३; श्रीजित सेन (८) वि.वि. प्रथम भुजबळ ४-६, ६-३, ६-४; निखिल थिरूमले (५) वि.वि. इंद्रजित बोरा ६-0, ६-२; विशाल पगाडला वि.वि. अर्जुन गोहाड ६-४, ७-५; अमृतजय मोहंती वि.वि. हृषीकेश पराशर ६-१, ६-३; आर्यन भाटिया (४) वि.वि. हितेश यमान्चीह्यी ६-१, ६-३; उदयवीर सिंग (७) वि.वि. अमान वासिम ६-२, ६-३; हर्षित गुमूलुरू वि.वि. आदित शहा ६-१, ६-२;,लेस्टन वाझ वि.वि. कुश ओरिया ६-७(६), ६-४, ६-३; निशांत डाबस (२) वि.वि. सन्मय गांधी ६-१, ६-२; मुली: बेला ताम्हणकर (१) वि.वि. स्नेहा रानडे ६-२, ६-३; परी सिंग वि.वि. मृण्मयी भागवत ६-0, ६-१; राधिका महाजन वि.वि. श्रीचंद्रा तेन्तू ६-४, ६-४. (क्रीडा प्रतिनिधी)