पी. आर. श्रीजेश : स्पेनला रवाना होण्यापुर्वी व्यक्त केले मतबंगळुरु : रिओ आॅलिम्पिकसारख्या सर्वात मोठ्या स्पर्धेत कोणताच सामना सोपा नसून स्पर्धेतील प्रत्येक संघाला बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी संधी निर्माण कराव्या लागतील, असे भारतीय हॉकी संघाचा कर्णधार पी. आर. श्रीजेश याने सांगितले. स्पेनला रवाना होण्यापुर्वी श्रीजेशने सांगितले की, आता आम्ही पदक मिळवण्यासाठी आॅलिम्पिकला जात आहोत आणि ही साधी स्पर्धा नसून येथे काहीही सहजसोपे नसते.
प्रत्येक सामना हा खडतर आणि आव्हानात्मक असतो. प्रत्येक गटात सहा संघ असून अव्वल चार संघ बाद फेरीत प्रवेश करतील. त्यामुळे आमचा प्रयत्न जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा असून याद्वारे बाद फेरीच्या संधी निर्माण करण्यावर आमचा भर आहे. शिवाय नव्या स्वरुपामुळे प्रत्येक संंघाला अतिरीक्त संधी मिळणार आहे.
उपांत्यपुर्व फेरीत आम्ही कोणत्याही संघाविरुध्द भिडण्यास सज्ज आहोत. आम्हाला कोणत्याही ठरवलेल्या संघाविरुध्द खेळायचे आहे असे सांगणार नाही. प्रत्येक संघाविरुध्द आम्ही आमचे पुर्ण योगदान देऊन स्वत:ला झोकून खेळू, भले तो संघ जागजेत्ता आॅस्टे्रलिया का नसेना.. असेही श्रीजेशने यावेळी सांगितले. ..........................................परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी आम्ही स्पेनला जात आहोत. स्पेनमध्ये आम्ही दोन सराव सामने खेळणार असून त्याद्वारे स्वत:ची क्षमता पडताळून पाहण्याची संधी मिळणार आहे. रिओचे वातावरण स्पेनप्रमाणेच असेल.- पी. आर. श्रीजेश