शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

...त्याची कुणाला अपेक्षा नव्हती

By admin | Published: June 15, 2017 4:03 AM

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात झाली, त्या वेळी भारत आणि बांगलादेश संघांदरम्यान उपांत्य फेरीची लढत होईल, अशी अपेक्षा कुणी केली नव्हती. बांगलादेश

- सौरभ गांगुली लिहितात...चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात झाली, त्या वेळी भारत आणि बांगलादेश संघांदरम्यान उपांत्य फेरीची लढत होईल, अशी अपेक्षा कुणी केली नव्हती. बांगलादेश संघाला ‘कच्चा लिंबू’ समजण्याचे दिवस आता गेले. ते दिग्गज संघांविरुद्ध तूल्यबळ खेळ करीत त्यांनी त्याची प्रचिती दिली आहे. दिवसागणिक त्यांच्या कामगिरीचा आलेख उंचावत आहे. २०१५च्या विश्वकप स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्रता मिळविणे त्याचे उत्तम उदाहरण आहे. आयसीसी मानांकनामध्ये अव्वल आठमध्ये असल्यामुळे बांगलादेश संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. आता त्यांच्यासाठी त्यापुढची पायरी गाठण्याची वेळ आलेली आहे. साखळी फेरीत बांगलादेश संघाची कामगिरी प्रत्येक लढतीगणिक सुधारली. न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत त्यांनी सर्वोत्तम खेळ केला. आता बांगलादेश संघाचा समतोल साधला गेला असून, भारताविरुद्धची महत्त्वाची लढत त्यांच्यासाठी परीक्षा ठरणार आहे. तमीम, शाकीब, मुशफिकर व कर्णधार मशरफी यांची क्षमता व अनुभव संघासाठी महत्त्वाचा आहे. मुस्ताफिजूर, तस्किन आणि रुबेल यांच्या समावेशामुळे वेगवान गोलंदाजीची बाजू बळकट झाली आहे. महमुदुल्ला, सौम्या सरकार हे फलंदाज आपली उपयुक्तता सिद्ध करण्यास सज्ज आहेत. बांगलादेश संघाचे क्षेत्ररक्षणही सुधारत आहे. मनस्थिती ही बांगलादेश संघासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. मानसिकदृष्ट्या बांगलादेश संघ उपांत्य लढत खेळण्यास सज्ज असायला हवा. संघातील सिनिअर खेळाडूंनी ज्युनिअर खेळाडूंना दडपण न बाळगता भावनांवर नियंत्रण राखण्यासाठी मार्गदर्शन करायला हवे. आणखी एक आंतरराष्ट्रीय लढत असे समजून खेळल्यास ‘अ‍ॅड्रेलिन’वर नियंत्रण राखता येईल. अनेकदा खेळाडूंची मनोवृत्ती त्यांंच्या नैसर्गिक खेळ करण्याच्या मार्गात आडकाठी ठरत असते. बांगलादेशच्या खेळाडूंनी त्यापासून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ते भारताविरुद्ध खेळत असून, क्रिकेट विश्वात ही नवी प्रतिस्पर्धा उदयास आली आहे. इंग्लंडमध्ये अनेक बांगलादेशी आहेत. त्यामुळे येथे हे चाहते मायदेशातील वातावरण निर्माण करू शकतात. (गेमप्लॉन)अशा स्थितीत दडपण व अपेक्षा वाढणार असल्यामुळे बांगलादेश संघासाठी परिस्थिती सोपी राहणार नाही. हे सर्व जरी खरे असले, तरी बांगलादेश संघाला भारताच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे, हे सत्य आहे.दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची कामगिरी उल्लेखनीय ठरली. अश्विनच्या समावेशामुळे जडेजा एकदम वेगळाच गोलंदाज भासायला लागला. भुवनेश्वर, बुमराह व हार्दिक या त्रिकुटाच्या भेदक माऱ्यानंतर फलंदाजांनीही वर्चस्व गाजवले. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शिखर धवनची कामगिरी विशेष बहरते. मधल्या फळीतील फलंदाजही फॉर्मात आहेत. बांगलादेश संघाला कमी लेखता येणार नाही, याची भारतीय संघाला कल्पना आहे. त्यांच्या तुलनेत आपला संघ चांगला असून प्रत्येक ाला आपल्याकडून विजेतेपदाची अपेक्षा आहे, याची भारतीय संघाला जाण आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. प्रत्येक लढतीगणिक त्याच्या नेतृत्वामध्ये विशेष सुधारणा दिसून येत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने संघाचे नेतृत्व योग्यपणे हाताळले. बांगलादेश संघाला कमी लेखण्याची चूक तो करणार नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत खेळलेला संघच कायम राहील, असे संकेत मिळत आहेत. (गेमप्लॉन)