शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

भारतात टेनिससाठी पुरेसा पैसा, एआयटीए इच्छुक नाही : कार्ती

By admin | Published: January 09, 2017 12:52 AM

भारतात टेनिस खेळाडूंसाठी पैसे गोळा करणे ही समस्या नाही; मात्र अखिल भारतीय टेनिस संघाने त्यासाठी इच्छाशक्ती दाखवायला हवी

चेन्नई : भारतात टेनिस खेळाडूंसाठी पैसे गोळा करणे ही समस्या नाही; मात्र अखिल भारतीय टेनिस संघाने त्यासाठी इच्छाशक्ती दाखवायला हवी, असे तमिळनाडू टेनिस संघाचे उपाध्यक्ष कार्ती चिदंबरम यांनी स्पष्ट केले. त्यासोबतच त्यांनी मान्य केले की, देशात फक्त क्रिकेटच व्यावसायिक रूपात खेळ आहे.चेन्नई ओपनच्या आयोजन समितीचे अध्यक्ष कार्ती म्हणाले की, भारताकडे चांगले एकेरी खेळाडू नाही. त्यामुळे बदलाच्या काळात त्यांना आयटीएची साथ मिळत नाही. एआयटीएने २०१४ मध्ये हितसंबधांच्या वादाचे कारण देत कार्ती यांचे उपाध्यक्षपद रद्द केले होते.कार्ती यांनी म्हटले की, ‘‘आमच्याकडे खेळाडूंसाठी पैसा नाही, असे नाही. सहा खेळाडूंसाठी दरवर्षी जास्तीत जास्त तीन कोटी रुपये लागतात. ही रक्कम फार जास्त नाही; मात्र इच्छाशक्तीचा अभाव आहे. लोक मंदिरांसाठी पैसे गोळा करतात.’’कार्ती यांनी सांगितले की, त्यांच्याकडे योजना आहे. ती लागू केल्यास भारतीय टेनिसचे दिवस बदलतील. कार्ती यांनी सांगितले की, ‘‘युकी भांबरी, सुमित नागल, रामकुमार रामनाथन, दक्षिणेश्वर सुरेश आणि नितीन सिन्हा यांना समर्थन दिले पाहिजे. त्यांच्यासोबत प्रशिक्षक राहू शकतील. त्यांनी २६ स्पर्धांमध्ये खेळले पाहिजे. त्यातील १८ विदेशांत होतील आणि वर्षातील सहा आठवडे आरामदेखील करायला हवा. कार्ती यांच्या मते हे सर्व तीन कोटी रुपयांत होऊ शकते.’’ कार्ती पुढे म्हणाले, ‘‘एआयटीएने जर आपले वजन वापरले आणि ५० कोटी रुपयांचा विकास कोष तयार केला, तर देशात खेळाला खूप फायदा होईल.’’