शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

इच्छामरणाची ही वेळ नव्हे!

By admin | Published: September 13, 2016 3:39 AM

जगण्यासाठी सारखी लढाई सुरूच आहे.’ रिओत सुरू असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये बेल्जियमची मारिका व्हेरमूर्त हिची ही प्रेरणादायी कहाणी

रिओ : ‘ती मांसपेशींच्या विकृतीसारख्या असाध्य आजाराने पीडित आहे. या आजारामुळे तिच्या पायांमध्ये इतके दुखणे उमळते की रात्री झोपदेखील लागत नाही. १४ व्या वर्षी तिला या आजाराची माहिती झाली. तेव्हापासून जगण्यासाठी सारखी लढाई सुरूच आहे.’रिओत सुरू असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये बेल्जियमची मारिका व्हेरमूर्त हिची ही प्रेरणादायी कहाणी! सोमवारी ३७ व्या वर्षी मारिकाने महिलांच्या व्हिलचेअरच्या ४०० मीटर दौडीत रौप्य जिंकले. पदक जिंकताच जगणे किती सुंदर आहे, याची तिला प्रचिती आली असावी. ती म्हणते, इच्छामरणाची ही वेळ नव्हे...!बेल्जियममध्ये ‘यूथेनिसिया’ अर्थात इच्छामरणाला वैधानिक मान्यता आहे. मारिकाने २००८ साली आयुष्याला कंटाळून इच्छामृत्यूच्या कागदपत्रांवर स्वाक्षरीदेखील केली. आॅलिम्पिक पदक जिंकण्याच्या धेय्याने झपाटलेली ही खेळाडू जगण्यातील संघर्षावर मात करीत सराव करीत राहिली. अखेर तिच्या संघर्षाला यश आले व तिने पदकही जिंकले. पदक हातात येताच ती म्हणाली,‘से नो टू डाय...!’ बेल्जियमच्या मीडियाने रिओ पॅरालिम्पिकनंतर मारिका स्वत:चे आयुष्य संपवू शकते, असे वृत्त प्रकाशित केले होते. आज खुद्द मारिकाने एका पत्रकार परिषदेत इच्छामरणासंदर्भातील सर्व बातम्यांचे खंडण केले. ती म्हणाली, ‘‘आता तर आयुष्यातील सर्व लहानमोठ्या प्रसंगांचा आनंद घेण्यास सज्ज आहे.’’मारिका पुढे म्हणाली, ‘‘आयुष्य किती सुंदर आहे, हे मला आता कळले. चांगल्या दिवसांच्या तुलनेत वाईट दिवस अधिक असतील, असे कळून चुकेल त्या वेळी मी इच्छेनुसार मरण पत्करेन. पण सध्यातरी ती वेळ आलेली नाही.’’ व्हीलचेअर रेसला करिअर म्हणून निवडणारी मारिका २०१२ च्या लंडन पॅरालिम्पिकमधील १०० मीटर प्रकारात सुवर्ण आणि २०० मीटर प्रकारातील रौप्य विजेती आहे. (वृत्तसंस्था)