शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
3
Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं?
4
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
5
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
6
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
7
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 
8
एलन मस्कही चक्रावले! टेस्लाच्या सायबर ट्रकची रशिया-युक्रेन युद्धात एन्ट्री; सात किमीपर्यंत गनचा मारा
9
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
10
'आप'कडून अरविंद केजरीवालांसाठी सरकारी निवासस्थानाची मागणी, निवडणूक आयोगाच्या नियमांचा दिला हवाला 
11
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
12
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
15
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
16
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
17
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
18
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
19
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
20
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  

'गोल्डन' कमबॅक! अल्कराजशी पराभवाचा वचपा काढत जोकोविचने जिंकलं ऑलिम्पिक सुवर्णपदक!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2024 9:01 PM

Novak Djokovic wins Gold Medal vs Carlos Alcaraz, Paris Olympics 2024: गेल्या महिन्यात झालेल्या विम्बल्डन फायनलमध्ये कार्लोस अल्कराजने नोवाक जोकोविचचा पराभव केला होता. त्या पराभवाचा जोकोविचने वचपा काढला.

Novak Djokovic wins Gold Medal vs Carlos Alcaraz, Paris Olympics 2024: अनुभवी टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने आज आपले अपूर्ण स्वप्न केले. त्याने कारकिर्दीत प्रथमच ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले. जोकोविचने रविवारी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत कार्लोस अल्काराजचा पराभव करून इतिहास रचला. ३७ वर्षीय सर्बियन खेळाडू जोकोविचने अल्काराजचा ७-६(३), ७-६(२) असा सरळ सेटमध्ये पराभव केला. २४ ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकावणाऱ्या जोकोविचला ऑलिम्पिक पदकाची खूप दिवसांपासून आतुरता होती. त्याने इटलीच्या लोरेन्झो मुसेट्टीचा पराभव करून आपल्या पहिल्या ऑलिम्पिक फायनलमध्ये प्रवेश केला होता. अव्वल मानांकित जोकोविच मागील तीन ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत पराभूत झाला होता. पण यावेळी त्याची स्वप्नपूर्ती झाली.

जोकोविचने काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या विम्बल्डन फायनलमध्ये अल्कराजकडून पराभव स्वीकारला होता. त्यानंतर आज त्याला या पराभवाचा 'हिसाब बराबर' करण्याची संधी चालून आली. आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये आधीच्या फेऱ्यांमध्येच स्पर्धेबाहेर होणाऱ्या जोकोविचने यावेळी कोणालाही तक्रारीची संधी दिली नाही. पहिल्या मिनिटापासूनच त्याने आक्रमणाचा पवित्रा स्वीकारला. पहिल्या सेट टायब्रेकरमध्ये गेल्यावर त्यात जोकोविचने आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर केला आणि तो सेट जिंकला. दुसरा सेटही दमदार झाला. कोणीही हार मानायला तयार नसल्याने हा सेटही टायब्रेकरपर्यंत गेला. या टायब्रेकरमध्ये जोकोविचने अल्काराजच्या विजयाला ब्रेक लावला आणि दुसरा सेटही जिंकला. त्यामुळेच ७-६(३), ७-६(२) अशा सरळ सेटमध्ये त्याने अल्कराजला पराभव करत दमदार कमबॅक केले.

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Novak Djokovicनोव्हाक जोकोव्हिचTennisटेनिस