पॅरिस : जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू नोव्हाक जोकोविच याने सलग १0 या आणि एकूण १३ व्यांदा फ्रेंच ओपनच्या अंतिम १६ मध्ये प्रवेश केला आहे. महिलांच्या गटात अव्वल मानांकित नाओमी ओसाका हिचे आव्हान संपुष्टात आले आहे. शनिवारी मिळवलेल्या विजयासह अव्वल मानांकित आणि २0१६ चा चॅम्पियन जोकोविचने अशा प्रकारे सर्वच चार ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. जोकोविचने इटलीच्या सालवाटोर कारुसो याचा ६-३, ६-३, ६-२ असा सहज पराभव करीत पुढील फेरी गाठली. आता त्याची लढत जर्मनीच्या जान लेनार्ड स्ट्रफ आणि बोर्ना कोरिच यांच्या सामन्यातील विजयी खेळाडूविरुद्ध होईल.
विद्यमान यूएस ओपन चॅम्पियन आणि ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन ओसाका हिला झेक प्रजासत्ताकच्या कॅटरिना सिनियाकोव्हा हिने ६-४, ६-२ असा सनसनाटी पराभव केला. जर्मनीच्या पाचव्या मानांकित अॅलेक्झांडर ज्वेरेव्ह याने २२ वर्षीय सर्बियाच्या दुसान लाजोविच याचा ६-४, ६-२, ४-६, १-६, ६-२ असा पराभव केला. आता झ्वेरेव्ह याची लढत इटलीच्या फॅबियो फोगनिनी याच्याशी होईल.
हालेप पुढील फेरीतमहिलांच्या गटात गत चॅम्पियन आणि तृतीय मानांकित सिमोना हालेप हिने युक्रेनच्या २७ व्या मानांकित लेसिया सुरेंको हिचा ६-२, ६-१ असा पराभव करीत पुढील फेरी गाठली. आता रोमानियाच्या सिमोना हिची लढत मोनिका पुइग आणि पोलंडची युवा इगा स्वियाटेक यांच्यातील विजयी खेळाडूविरुद्ध होईल.