शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
3
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
4
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
7
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
8
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
9
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
10
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
11
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
12
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
13
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
14
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
15
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
16
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
17
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
18
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
19
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
20
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा

आता ‘छोटे मियाँ’ही म्हणता येणार नाही

By admin | Published: February 20, 2015 1:53 AM

आयर्लंड, अफगाणिस्तान, स्कॉटलंड या तुलनेने कमकुवत मानल्या जाणाऱ्या संघांची कामगिरीही आश्चर्यचकित करणारी आहे.

अ कराव्या विश्वकप स्पर्धेत भारत, आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड आदी दिग्गज संघांची कामगिरी उल्लेखनीय ठरत असताना आयर्लंड, अफगाणिस्तान, स्कॉटलंड या तुलनेने कमकुवत मानल्या जाणाऱ्या संघांची कामगिरीही आश्चर्यचकित करणारी आहे. यातील अनेक संघ आयसीसीचे असोसिएट सदस्य आहेत. या संघांविरुद्ध दिग्गज संघ पूर्ण गुण वसूल करतील, असे मानले जात होते. या संघांच्या समावेशामुळे विश्वकप स्पर्धेतील रंगत कमी होईल, असे जाणकारांचे मत होते; पण या स्पर्धेत या संघांनी लक्षवेधी कामगिरी केली आहे. या संघांच्या कामगिरीमुळे त्यांच्याबाबत उल्लेख करताना आता ‘छोटे मियां’ किंवा ‘छोटे उस्ताद’ अशा शब्दांचा उल्लेख करणे योग्य वाटत नाही. या संघांनी दिग्गज संघांना घाम गाळायला भाग पाडले आहे. आयर्लंड संघाने दोनदा विश्वविजेतेपद पटकाविणाऱ्या विंडीज संघाविरुद्ध विजय मिळविला. ‘आयरन लँड’ मानल्या जाणाऱ्या आयरिश संघाने प्रतिस्पर्धी संघाने दिलेल्या ३०४ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करीत दिग्गज संघांनी आम्हाला कमी लेखण्याची चूक करू नये, असा इशारा दिला आहे.आयर्लंडचा कर्णधार विलियम पोर्टरफिल्डने या लढतीत विजय मिळविल्यानंतर प्रतिक्रिया देताना ‘नवखा’ संघ संबोधण्यावर आक्षेप नोंदविता होता. आम्ही दिग्गज संघांप्रमाणे निकाल नोंदवीत असल्याचे पोर्टरफिल्डने म्हटले होते. आयर्लंडप्रमाणे स्कॉटलंड संघांची कामगिरीही उल्लेखनीय ठरली आहे. सह-यजमान व जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या न्यूझीलंडला ड्युनेडिनमध्ये खेळल्या गेलेल्या लढतीत स्कॉटलंडने घाम गाळायला लावला. या लढतीत ‘मॅक्युलम अ‍ॅण्ड कंपनी’ला विजय मिळविताना संघर्ष करावा लागला. नेल्सनमध्ये गुरुवारी यूएई संघाने झिम्बाब्वेविरुद्ध अशाच प्रकारची कामगिरी केली. वन-डे क्रिकेटमध्ये प्रथमच २८५ धावांची मजल मारताना अमिरात संघाने झिम्बाब्वे संघापुढे आव्हान निर्माण केले. झिम्बाब्वेने या लढतीत सरशी साधली असली तरी त्यासाठी त्यांना ६ गड्यांचे मोल द्यावे लागले. विश्वकप स्पर्धेत ‘लहान’ संघाच्या कामगिरीची चर्चा होईल त्या वेळी केनिया संघाची नेहमी आठवण येईल. १९९६ मध्ये विश्वकप स्पर्धेत प्रथमच खेळताना केनिया संघाने वेस्ट इंडिजसारख्या बलाढ्य संघाला पराभूत करण्याचा पराक्रम केला होता. त्यानंतर २००३ च्या विश्वकप स्पर्धेत या संघाने कमाल केली. श्रीलंका, झिम्बाब्वे व बांगलादेश या कसोटी खेळणाऱ्या संघांना पिछाडीवर सोडत केनियाने उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत त्यांना भारताविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. तत्कालीन संघ तयार करण्याची जबाबदारी भारतीय निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी घेतली होती, हे विशेष. पण खेदाने नमूद करावे लागते की, २०१९ मध्ये इंग्लंडच्या यजमानपदाखाली आयोजित १२ व्या विश्वकप स्पर्धेत यापैकी मोजकेच संघ दिसणार आहे. पुढील विश्वकप स्पर्धेत केवळ १० संघ सहभागी होणार आहेत. कारण, आयसीसीसोबत संलग्न असलेले दोन संघ २०१८ मध्ये ढाक्यात होणाऱ्या विश्वकप पात्रता फेरीनंतर निश्चित होतील.