शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
7
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
8
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
9
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
10
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
11
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
12
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
13
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
14
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
15
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
16
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
17
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
18
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
19
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
20
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”

आता कोहलीचा कस लागेल : वॉर्नर

By admin | Published: January 05, 2015 3:21 AM

भारताचा नवीन कसोटी कर्णधार विराट कोहलीवर मानसिक दबाव वाढवण्याची मालिका कायम ठेवताना आॅस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने सिडनीत होणा-या चौथ्या कसोटीत कोहली

सिडनी : भारताचा नवीन कसोटी कर्णधार विराट कोहलीवर मानसिक दबाव वाढवण्याची मालिका कायम ठेवताना आॅस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने सिडनीत होणाऱ्या चौथ्या कसोटीत कोहली किती आक्रमक कर्णधार आहे हे पाहू इच्छितो. तो म्हणाला, आता त्याचा खरा कस लागेल. गत कसोटीप्रमाणेच तो आक्रमकता दाखवतो किंवा नाही, हे मी पाहू इच्छितो.महेंद्रसिंग धोनीने कसोटी क्रिकेटमधून अचानक घेतलेल्या निवृत्तीनंतर कोहलीकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. वॉर्नर म्हणाला, एम. एस. धोनी खेळाविषयी खूप विचार करतो आणि त्याच्यात खूप समज आहे. फलंदाजाला कसे बाद करायचे, हे त्याला माहीत आहे. तो खूप चतुर कर्णधार आहे. त्याच्यासमोर खेळणे हे खूपच आव्हानात्मक राहिले आहे. तो कोणती चाल रचेल याचे विचार नेहमी तुमच्या डोक्यात असतात.आक्रमक वातावरणाविषयी वॉर्नरने कोणत्याही खेळाडूने मर्यादेचे उल्लंघन करायला नको, असे म्हटले. तथापि, त्याने स्वत: मर्यादेचे उल्लंघन केल्याचेही मान्य केले. तो म्हणाला, मी याआधी अनेकदा मर्यादेचे उल्लंघन केले. फक्त भारतीय संघाविरुद्धच नाही, तर आम्ही नेहमीच असे करतो आणि असाच विकेट घेण्याचा जल्लोष करतो. आम्हाला सर्वांनाच अतिउत्साही होऊ नये, यावर सर्वांनीच लक्ष द्यायला हवे. सर्वांत चांगली पद्धत म्हणजे त्या बाबींकडे दुर्लक्ष करून तुम्ही विकेट घेऊन उत्तर द्यायला हवे. अखेर तुमचाच विजय होईल. तो पुढे म्हणाला, ‘‘मला शिकावे लागेल. भूतकाळातूनही मी शिकलो; परंतु आम्ही सर्वच माझ्याकडून शिकवण घेऊ शकता.’’मिचेल जॉन्सन चौथी कसोटी खेळत नाही. त्यामुळे मैदानावर प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध टोमणेबाजीला साथ मिळू शकणार नाही, असेही विनोदाने वॉर्नर म्हणाला.तो म्हणाला, मिचेल मला साथ देतो. त्यामुळे मी टोमणेबाजी कशी करू हे मला माहीत नाही. मिचेलमध्ये हा एक्स फॅक्टर आहे. प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजालाही दहशत बसते की, मिचेलचे तीन किंवा पाच षटके खेळायची आहेत आणि ते खूपच कठीण असेल. तो म्हणाला, आमच्याकडे मिशेल स्टार्कसारखे १५० कि.मी. वेगाने गोलंदाजी करणारे गोलंदाज आहेत. कमिन्स, जोश हेजलवूडदेखील १४०च्या गतीने गोलंदाजी करण्यास माहीर आहेत. (वृत्तसंस्था)