कोलंबो : कुमार संगकाराच्या नाबाद 54 धावा आणि माहेला जयवर्धनेच्या नाबाद 49 धावांच्या बळावर o्रीलंकेने पाकिस्तानविरुद्धच्या दुस:या कसोटीत 165 धावांची आघाडी घेतली आहे. श्रीलंकेने दुस:या डावात 2 बाद 177 धावा केल्या आहेत.
तत्पूर्वी, रंगना हेराथने 33.1 षटकांत 127 धावा देत 9 गडी बाद करताना पाकचा पहिला डाव 332 धावांत रोखला. पाकिस्तानकडून यष्टिरक्षक सर्फराज अहमदने 127 चेंडूंत 7 चौकार व एका षटकारासह 1क्3 धावा करताना त्याचे पहिले शतक ठोकले. पाकला श्रीलंकेवर पहिल्या डावात 12 धावांची आघाडी मिळवता आली. (वृत्तसंस्था)