भारतीय हॉकी संघ स्पॉन्सरसाठी गटांगळ्या खात असताना ओदिशा सरकारनं मदतीचा हात पुढे करून या खेळाला नवसंजीवनी दिली. २०१८मध्ये जेव्हा सहारानं भारतीय हॉकी संघाचे प्रायोजकत्व संपुष्टात आणले तेव्हा ओदिशा सरकार पुढे आली. ओदिशा सरकारनं २०१८मध्ये हॉकी इंडियासोबत ५ वर्षांचा करार केला आणि ज्युनियर, सीनियर, पुरुष व महिला राष्ट्रीय संघासाठी १५० कोटींचा करार केला. २०२३पर्यंत हा करार आहे आणि याशिवाय ओदिशा सरकार वर्ल्ड क्लास ट्रेनिंग, रिहॅब फॅसिलिटी, प्रॅक्टिस पिचच्या माध्यमातून भारतीय हॉकीला संजीवनी दिली. त्याचेच फळ टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत मिळाले.
ओदिशा सरकारचा पुढाकार! २०१३पासून ओदिशा सरकार हॉकीला प्रमोट करत आहे. २०१३मध्ये हॉकी इंडिया लीग खेळवण्यात आली तेव्हा ओदिशा राज्यातील दोन व्यावसायिकांनी कलिंगा लँसर्स फ्रँचायझी खरेदी केली. २०१४मध्ये ओदिशा सरकारनं चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषविले होते. त्यानंतर २०१७ हॉकी वर्ल्ड लीग आणि २०१८ हॉकी वर्ल्ड कप येथे झाला होता. २०२३ चा हॉकी वर्ल्डकपही येथे आयोजित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. ओदिशा सरकारनं २०१८मध्ये हॉकी इंडियासोबत ५ वर्षांचा करार केला. त्यामुळेच हॉकी संघाच्या यशानंतर ओदिशा सरकार व मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे आभार मानले जात आहे.
भारताच्या पदक विजेत्या पुरुष हॉकी संघातील राज्याच्या खेळाडूला प्रत्येकी २.५ कोटी अन् महिलांना ५० लाख देण्याची घोषणा ओदिशा सरकारनं केली आहे. शिवाय अमित रोहिदास व बीरेंद्र लाक्रा यांची ओदिशा पोलिस DSP म्हणून नियुक्ती केली आहे. ( Odisha announces awards to its #hockey stars of #Olympics. Rs 2.5cr each for men and Rs 50 lakh each for women. Plus appointment as DSP with Odisha Police for men (Amit Rohidas & Birendra Lakra). )