शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
4
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
5
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नांदेड पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसचा विजय; रविंद्र चव्हाण यांचा १४५७ मतांनी विजय
7
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
9
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
10
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
11
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
12
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
13
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
14
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
16
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
17
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
18
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"

Neeraj Chopra : सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्रानं पुन्हा उंचावली भारताची मान; जाणून तुम्हालाही वाटेल अभिमान!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 7:33 PM

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून डौलानं तिरंगा फडकावणाऱ्या नीरज चोप्रानं पुन्हा एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून डौलानं तिरंगा फडकावणाऱ्या नीरज चोप्रानं पुन्हा एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भालाफेकपटू नीरजनं टोकियोत ८७.५८ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदक पटकावले. भारताच्या ऑलिम्पिक स्पर्धा इतिहासातील १२५ वर्षांतील हे अॅथलेटिक्समधील पहिलेच पदक ठरले. दिवंगत मिल्खा सिंग व पी टी उषा यांची ऑलिम्पिक पदक जिंकण्याची संधी थोडक्यात हुकली होती. पण, नीरजनं हे स्वप्न पूर्ण केलं. २००८नंतर पहिल्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत राष्ट्रगीत वाजले. 

सुवर्णपदक विजेत्या नीरजनं जागतिक भालाफेक क्रमवारीत १४ स्थानांनी झेप घेताना थेट दुसरा क्रमांक पटकवला आहे. ( India’s Neeraj Chopra to move up 14 places to second place in the latest World Athletics Rankings) त्याच्या खात्यात आता १३९५ गुण जमा झाले असून जर्मनीचा जोहानेस वेट्टर हा १३९६ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. विशेष म्हणजे वेट्टरला ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये नवव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. मार्सिन क्रुकोवस्की ( १३०२) तिसऱ्या, टोकियोत रौप्यपदक जिंकणारा जाकूब व्हॅड्लेजच ( १२९८०) चौथ्या आणि ज्युलियन वेबर ( १२९१) पाचव्या क्रमांकावर आहे.  

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्राOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021