आॅलिम्पिया : ग्रीसचे प्राचीन शहर आॅलिम्पिया येथे गुरुवारी आॅलिम्पिक ज्योतीचे शानदार सोहळ्यात प्रज्वलन करण्यात आले. यासोबतच ब्राझीलच्या रिओत आॅगस्ट महिन्यात आयोजित सर्वांत मोठ्या क्रीडा महाकुंभाचे काउंटडाउन सुरू झाले.ब्राझीलमध्ये राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना आयोजक मात्र आॅलिम्पिक यशस्वी करण्यासाठी जिद्दीने कामाला लागले आहेत. आॅलिम्पिया येथील प्राचीन स्टेडियममध्ये एका अभिनेत्रीने हेरा मंदिरात काचेच्या मदतीने सूर्यकिरणांनी क्रीडाज्योतीचे पारंपरिक प्रज्वलन केले. मशाल प्रज्वलित होताच ग्रीसचा जिम्नॅस्ट विश्वविजेता लेफ्टेरिस पेट्रोनियास याने रिलेला सुरुवात केली. त्याने ब्राझीलचा दोनदा आॅलिम्पिक चॅम्पियन राहिलेल्या व्हॉलिबॉल संघातील खेळाडू जियोनावे गाबियो याच्याकडे ज्योत सोपविली. येथे आलेल्या शरणार्थींनादेखील रिलेत ज्योत धरण्याची संधी देण्यात आली.
आॅलिम्पिक ज्योत प्रज्वलित; रिओचे ‘काउंटडाउन’ सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2016 2:35 AM