शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

ऑलिम्पिक क्रीडा महाकुंभ आजपासून; भारतीय खेळाडूंना ऐतिहासिक कामगिरीची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 8:16 AM

कोरोनाची दहशत कायम असताना टोकियो ऑलिम्पिकचा महाकुंभ आज शुक्रवारपासून सुरू होत आहे.

टोकियो : कोरोनाची दहशत कायम असताना टोकियो ऑलिम्पिकचा महाकुंभ आज शुक्रवारपासून सुरू होत आहे. वर्षभर लांबणीवर टाकण्यात आलेल्या या ऑलिम्पिकची नोंद मात्र २०२० अशीच होईल, हे विशेष. खेळाडूंमध्ये उत्साह आणि स्फूर्ती असली तरी प्रेक्षकांची साथ मिळणार नसल्याने मनात शंका आणि तणाव कायम आहे. तरीही ‘आशेचा किरण’ ठरणाऱ्या क्रीडाविश्वातील सर्वांत मोठ्या आयोजनात भारतीय खेळाडू स्वत:च्या लौकिकाची ऐतिहासिक यशोगाथा लिहितील, अशी देशवासीयांना अपेक्षा आहे.

कुस्ती, नेमबाजी, मुष्टियुद्ध या खेळात पदकांची आशा आहे. जगातील सर्वांत मोठी लोकसंख्या असलेल्या शहरांपैकी एक टोकियोत हजारो खेळाडू, सपोर्ट स्टाफ, आणि अधिकाऱ्यांची मांदियाळी भरली असल्याने प्रत्येक दिवशी हजारावर कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. यातील मोजकी प्रकरणे खेळाशी संबंधित असली तरी भय कायम आहे. ऑलिम्पिक भावनेचे प्रतीक असलेला प्रेक्षकांचा उत्साह येथे पहायला मिळत नाही. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये केवळ सकारात्मक गोष्टींवर फोकस असावा असा आयओसीचा प्रयत्न आहे. शुक्रवारच्या उद्‌घाटनानंतर ८ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या ऑलिम्पिकला अधिकृत सुरुवात होणार आहे. भारताचा विचार केल्यास १३० कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाने आतापर्यंत २९ पदके जिंकली.१९०० ला पहिल्यांदा सहभाग नोंदविला. तेव्हापासून वैयक्तिक सुवर्ण केवळ नेमबाज अभिनव बिंद्राच्या नावावर आहे. २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये त्याने हे पदक जिंकले होते. यंदा १२७ खेळाडू सहभागी झाले असून त्यांच्याकडून मोठी अपेक्षा असेल. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने सहा पदके जिंकली, पण त्यात एकही सुवर्ण नव्हते.

भारताचे २० खेळाडू, ६ अधिकारी सहभागी होणार

- ऑलिम्पिक उद्‌घाटन सोहळ्यात केवळ २० खेळाडू सहभागी होणार आहेत. दुसऱ्या दिवशी ज्यांची स्पर्धा आहे, अशांना आधीच सोहळ्यापासून दूर ठेवण्यात आले. 

- २० खेळाडू आणि सहा अधिकारी असे २६ जण भारतीय पथकात असतील. कोरोनाच्या संकटापासून वाचविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आयओए महासचिव राजीव मेहता यांनी दिली. 

- भारतीय पथकात १२७ खेळाडूंसह एकूण २२८ जणांचा समावेश आहे. नेमबाजांच्या दुसऱ्या दिवशी स्पर्धा असल्याने ते सोहळ्यात उपस्थित राहणार नाहीत. 

- मेरी कोमसह भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीतसिंग हा सोहळ्यात ध्वजवाहक असेल.  

- जे खेळाडू सहभागी होणार आहेत, त्यात मनिका बत्रा आणि अचंता शरथ कमलसह टेटेचे चार खेळाडू, नौकायानचे चार खेळाडू, तलवारबाज भवानीदेवी, जिम्नॅस्ट प्रणती नायक आणि जलतरणपटू  साजन प्रकाश, मुष्टियोद्धे सिमरनजीत कौर, लवलीना बोरगोहेन, पूजा रानी, अमित पंघाल, मनीष कौशिक, आशिष कुमार आणि सतीश कुमार यांचा समावेश असेल.

युगांडाचा बेपत्ता भारोत्तोलनपटू भारताच्या ट्रॅकसूटमध्ये आढळला

- युगांडाचा ऑलिम्पिकमधून बेपत्ता झालेला भारोत्तोलनपटू ज्युलियस सेकिटोलेंको हा नरिता विमानतळावर भारताचा ट्रॅकसूट घालून आढळल्यामुळे भारतीय ऑलिम्पिक पथकातील अधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. ज्युलियस ऑलिम्पिकचा सराव करताना पळून गेला होता. चार दिवसानंतर शोध घेत त्याची मायदेशी रवानगी करण्यात आली होती.

- एका वाहिनीने दाखविलेल्या वृत्तात २० वर्षांचा ज्युलियस नरिता विमानतळावर लाल रंगाच्या ट्रॅकसूटमध्ये दिसला. या सूटच्या मागे ‘इंडिया’ असे लिहिले आहे. भारतीय खेळाडूंनी २०१८ च्या गोल्डकोस्ट राष्ट्रकुलदरम्यान अशा प्रकारची किट घातली होती. 

- आयओए महासचिव राजीव मेहता यांनी यावर स्पष्टीकरण देत हा टोकियो ऑलिम्पिकचा अधिकृत ड्रेस नाही, असे म्हटले आहे.

- वृत्तसंस्थेशी बोलताना मेहता म्हणाले,‘हा रंग ऑलिम्पिकमध्ये भारताची राष्ट्रीय ऑलिम्पिक समिती देखील वापरत नाही.’

ऑलिम्पिकमध्ये आज भारत: 

- पहाटे ५.३० तिरंदाजी: महिला वैयक्तिक फेरी, दीपिका कुमारी. 

- सकाळी ९.३०: पुरुष वैयक्तिक फेरी अतानू दास, प्रवीण जाधव, तरुणदीप राय.

पदकांच्या दावेदारांवर असेल नजर

भारतासाठी यंदा १५ नेमबाज पदकांचे दावेदार आहेत. १९ वर्षांची मनू, २० वर्षांची इलावेनिल, १८ वर्षांचा दिव्यांश पंवार आणि २० वर्षांचा ऐश्वर्य प्रताप यांच्या कामगिरीकडे नजर असेल. भारोत्तोलनात ४९ किलो गटात मीराबाई चानू तर तलवारबाजीत सी. ए. भवानी देवी या देखील पदाकांच्या शर्यतीत आहेत. तिरंदाजीत नंबर वन असलेली दीपिका कुमारी हिच्या नेतृत्वाखालील तिरंदाजी पथकाकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत.

मुष्टियुद्धात अमित पंघाल, एम. सी. मेरीकोम, आशियाडचा माजी विजेता विकास कृष्ण हे ‘गोल्डन पंच’ची नोंद करू शकतात. दुसरीकडे सात मल्लांपैकी बजरंग पुनिया, विनेश फोगाट, दीपक पुनिया, रवी दहिया हे मोक्याच्या क्षणी पदक मिळवून देतील, अशी आशा आहे.मागच्या चार दशकापासून ऑलिम्पिक पदकाच्या प्रतीक्षेत असलेल्या महिला व पुरुष हॉकी संघाकडून उत्कृष्ट कामगिरी अपेक्षित आहे. भारताच्या पुरुष हॉकी संघाने आठवे आणि अखेरचे सुवर्ण पदक १९८० ला जिंकले होते. टेबल टेनिसमध्ये अचंता शरथ कमल आणि मनिका बत्रा कमाल करू शकतील. ॲथ्लेटिक्समध्ये भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि गोळाफेकपटू तेजिंदरसिंग तूर हे मिल्खासिंग यांचे पदकाचे स्वप्न पूर्ण करतील का,असा देशवासीयांना प्रश्न पडला आहे.

बॅडमिंटनमध्ये सिंधूने रियो ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या रौप्य पदकाचा रंग सुवर्णमय करेल का, याची उत्सुकता असून अनुभवी टेनिसपटू सानिया मिर्झा चौथ्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली आहे. अश्वारोहणपटू फौवाद मिर्झा तर जलतरणात साजन प्रकाश, श्रीहरी नटराज हे देखील नशिब अजमावणार आहेत. कोरोनामुळे निर्माण झालेले नैराश्य, भीती आणि त्रास या गोष्टी मागे टाकून आनंद देणारी कामगिरी घडावी, अशी कोट्यवधी भारतीयांची अपेक्षा आहे. 

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Indiaभारत