ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - भारताचे दिग्गज हॉकीपटू आणि १९६०च्या रोम आॅलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या भारतीय संघातील सदस्य जो. आंटिच यांचे अल्पशा आजाराने मुंबईत निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते रुग्णालयात उपचार घेत होते. आंटिच यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या निधनाचे वृत्त दिले.आंटिच यांचे वयाच्या ९०व्या वर्षी निधन झाले. १९६० साली झालेल्या रोम आॅलिम्पिकमध्ये रौप्य पदक विजेत्या भारतीय हॉकी संघात त्यांनी सेंटर हाफ म्हणून जबाबदारी पार पाडली होती. त्यांच्यापश्चात मुलगा विलियम आणि मुलगी रीता आहे. आंटिच्य यांच्या पत्नीचे २०११ साली निधन झाले होते.आंटिच यांचे पुत्र विलियम यांनी सांगितले की, ह्यह्यवडिलांची प्रकृती ढासळल्याने त्यांना रुग्णालयात आयसीयूमध्ये भरती करण्यात आले होते. मात्र त्यातून ते बाहेर आले नाही. त्यांनी देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली. मात्र यावेळी त्यांच्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध करुन देण्यास कोणीही पुढे आले नाही.ह्णह्णरोम आॅलिम्पिकमध्ये पाकिस्तान भारताला नमवून सुवर्णपदक पटकावताना भारताची ३२ वर्षांची सुवर्ण मालिका खंडीत केली होती. त्याचप्रमाणे १९६२ साली जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही रौप्यविजेत्या भारतीय संघात आंटिच यांचा समावेश होता. विशेष म्हणजे, त्याहीवेळेला भारताला पाकिस्तानकडून अंतिम सामन्यात पराभूत व्हावे लागले होते. (वृत्तसंस्था)