दोन ऑलिम्पिक पदकं नावावर असलेल्या सुशील कुमारचा ( Sushil Kumar) चा शोध दिल्ली पोलिसांकडून सुरू आहे. कनिष्ठ गटातील कुस्तीपटू सागर राणा याच्या हत्येचा गुन्हा सुशीलवर नोंदवला गेला आहे आणि दैनिक जागरणनं दिलेल्या वृत्तानुसार सुशील हरिद्वार येथील मोठ्या योग गुरूच्या आश्रमात लपला आहे. दिल्ली पोलिसांना याबाबची माहिती मिळाली आहे. ( Sushil Kumar is allegedly hiding from the world in a renowned Yoga Guru's Ashram in Haridwar)
जागरणनं दिलेल्या माहितीनुसार रोहतक येथे राहणारा सुशीलचा जवळचा मित्रा भुरा यानं दिल्ली पोलिसांना ही माहिती दिली. खूनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतरही सुशीलची काहिची प्रतिक्रिया आलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भुरा हा सुशीलच्या जवळच्या मित्रांपैकी एक आहे. तो सुशीलचा बिझनेस सांभाळत होता, परंतु काही वर्षांपूर्वी सुशीलनं त्याच्याकडून सर्व जबाबदारी काढून घेत, त्याला दूर केले. त्यानंतर ही जबाबदारी सुशीलनं अजय व भुपेंद्र यांच्याकडे सोपवली. भुपेंद्र हा फरिदाबाद येथे राहणार आहे आणि फरिदाबाद येथे त्याच्यावर खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.