Neeraj Chopra Brand Value : नुकत्याच पार पडलेल्या Paris Olympic 2024 मध्ये Neeraj Chopra ने रौप्य पदकावर आपले नाव कोरले. ऑलिम्पिकचे रौप्य पदक नीरजला सुवर्ण पदकासारखे यश मिळवून देत आहे. दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिकमधील यशानंतर नीरज चोप्राच्या नेट वर्थ, ब्रँड व्हॅल्यू आणि एंडोर्समेंट पोर्टफोलिओमध्ये मोठी वाढ होणार आहे. नीरज चोप्राचा एंडोर्समेंट पोर्टफोलिओ यावर्षी 32-34 पर्यंत पोहोचू शकतो. याचा अर्थ, तो 32 ते 34 ब्रँड्सच्या जाहिराती करेल.
नीरज चोप्राची ब्रँड व्हॅल्यू वाढलीमीडिया रिपोर्ट्सनुसार, नीरज चोप्रा सध्या 24 ब्रँड्सचे प्रमोशन करत आहे. लवकरच तो 6 ते 8 नवीन ब्रँड्सशी करार करू शकतो. मोठी गोष्ट म्हणजे, या ब्रँडमध्ये अमेरिकन स्पोर्ट्स वेअर कंपनी अंडर आर्मर आणि स्विस वॉच कंपनी ओमेगा यांचाही समावेश आहे. नीरज चोप्राशी 6 ते 8 नवीन ब्रँड जोडले गेले, तर तो अनेक भारतीय क्रिकेटपटूंनाही मागे टाकेल. रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्यासारखा लोकप्रिय खेळाडू 20 कंपन्यांचा ब्रँड ॲम्बेसेडर आहे आणि सूमारे 2.5 कोटी रुपये फी आकारतो. तर, नीरज चोप्रा त्याच्या सर्व एंडोर्समेंटसाठी वर्षाला सुमारे 3 कोटी रुपये घेतो. या रकमेत आता आणखी वाढ होऊ शकते.
ब्रँड व्हॅल्यू 377 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतेअसाही दावा करण्यात येतोय की, या वर्षाच्या अखेरीस नीरज चोप्राच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये सुमारे 50 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. सध्या नीरज चोप्राची ब्रँड व्हॅल्यू 248 कोटींपर्यंत आहे. या वर्षाच्या अखेरीस त्याची ब्रँड व्हॅल्यू 50 टक्क्यांनी वाढली, तर ती 377 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते. रौप्यपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राला इतका फायदा होत आहे, तर सुवर्णपदक जिंकून किती फायदा झाला असता, याची कल्पना करा.