नवी दिल्ली, दि. 29 - देशात यशाचे शिखर गाठणाºया खेळाडूंना डोक्यावर घेतले जाते, तर दुसरीकडे अपयशी ठरल्यास त्यांना कोणीही विचारत नाही. तशीच काही अवस्था आॅलिम्पियन भारतीय महिला हॉकीपटूंची रेल्वे प्रवासादरम्यान झाली. त्यांना चक्क फरशीवर बसून रेल्वे प्रवास करावा लागला. अशा प्रकारच्या अनुभवाचा सामना ३६ वर्षांनंतर आॅलिम्पिकसाठी पात्र ठरणाºया महिला हॉकी संघातील काही खेळाडूंना नुकताच आला. रिओ आॅलिम्पिकमधील अपयशानंतर त्यांना घरी परतताना रेल्वेच्या फरशीवर बसून प्रवास करावा लागला. प्राप्त वृत्तानुसार रिओ आॅलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाºया महिला हॉकीपटू नमिता टोप्पो, दीप ग्रेस इक्का, लिलिमा मिंज आणि सुनील लाकडा घरी परतताना रांचीच्या राऊरकेला येथे जात असताना धनबाद-एल्लेपे एक्स्प्रेसने प्रवास करीत होत्या. त्यांना बसण्यासाठी एकही सीट मिळू शकलेनाही. त्यांनी टीटीला आग्रह केल्यानंतरही ट्रेनच्या फरशीवरच बसून त्यांना प्रवास करणे भाग पडले.सुनीताने सांगितले, ‘‘आम्ही तिकीट तपासणाºयास आपली ओळखदेखील सांगितली आणि त्यांना अनेक दिवसांच्या प्रवासामुळे थकलो आहोत व एखाद-दोन सीट बसण्यासाठी आम्हाला उपलब्ध करून द्या असा आग्रह त्यांच्याकडे धरला; परंतु टीसीने चक्क असमर्थता दर्शवली आणि आम्हाला फरशीवर बसण्यास भाग पडले. तथापि, काही प्रवाशांनी आम्हाला बसण्यासाठी जागा दिली. देशाचे प्रतिनिधित्व करणाºया खेळाडूंसोबत असे उपेक्षापूर्णा वर्तन केले जाते याचे आम्हाला दु:ख वाटले.’’ त्यानंतर याची दखल रेल्वे अधिकाºयांनी घेत स्पष्टीकरण दिले. खेळाडूंना प्रथम पेनट्री कारमध्ये जागा देण्यात आली आणि त्यानंतर त्यांना थर्ड एसी सीट उपलब्ध करून देण्यात आले होते. तथापि, खेळाडूंनी याविषयी वेगळीच माहिती दिली आहे, असे अधिकाºयाने सांगितले.